Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नागपूर, भिवंडी, चाकण, पनवेल आणि... महाराष्ट्रात एकाचवेळी 27510 लोकांना जॉब मिळणार; 51270000000 रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक

महाराष्ट्रात 51270000000 रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात एकाचवेळी 27510 लोकांना जॉब मिळणार आहे. 

नागपूर, भिवंडी, चाकण, पनवेल आणि... महाराष्ट्रात एकाचवेळी 27510 लोकांना जॉब मिळणार;  51270000000 रुपयांची सर्वात मोठी गुंतवणूक

Maharashtra Receives Record Foreign Direct Investment : महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.  महाराष्ट्रात 5 हजार 127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे.  महाराष्ट्रात एकाचवेळी 27510 लोकांना जॉब मिळणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार करण्यात आला.  या करारानुसार राज्यात 10 हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. 
नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये लॉजिस्टिक पार्क विकसित केले जाणार आहेत. यामाध्यमातून राज्यात 27 हजार 510 रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.  सर्व प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणारे आहेत. 

'एमसीएमसीआर' येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसेच महानगरपालिकांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'एमसीएमसीआर' या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली आहे. पवई स्थित महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दिनांक 20 मे 2025  पर्यंत वाढवण्यात आली आहे. 

महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) येथे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मनुष्यबळास कौशल्य आणि क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण दिले जाते. एमसीएमसीआर येथे कंत्राटी तत्वावर काही शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक पदांसाठीची पदभरती जाहिरात दिनांक 2 मे   रोजी प्रसिद्ध झाली होती. प्रसिध्‍द झालेल्‍या जाहिरातीमध्‍ये अर्ज करण्‍यासाठी अंतिम मुदत दिनांक 13 मे 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नमूद करण्‍यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेअंतर्गत अधिकाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्‍यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठीची मुदत आता दिनांक 20 मे 2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. एकूण 15 संवर्ग मिळून 20 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. उमेदवारांना विविध संवर्गासाठी https://mcmcr.mcgm.gov.in/careers.php या लिंकवर अर्ज करता येईल. 

सदर नेमणूक प्रक्रिया ही नियमितपणे होणारी कंत्राटी तत्वावरील असल्याचे महानगरपालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्र (एमसीएमसीआर) च्या संचालकांनी स्पष्ट केले आहे. अधिकाधिक उमेदवारांना या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करणे शक्य व्हावे, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. कंत्राटी तत्वावरील भरती प्रक्रियेअंतर्गत अध्यापन, प्रशासकीय, कार्यालयीन, तांत्रिक तसेच चतुर्थ श्रेणी अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. 

Read More