Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Video Viral : ''आम्ही अडाणी बायका, म्हणून नवऱ्याच्या...'' मराठी काकूचा व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Marathi Kaku Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका मराठी काकूचा व्हिडीओ धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाने बघावा असा व्हिडीओ आहे. तुम्ही पण नक्की बघा काय सांगतेय ही काकू...

Video Viral : ''आम्ही अडाणी बायका, म्हणून नवऱ्याच्या...'' मराठी काकूचा व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Maharashtra Women Viral Video : आज सोशल मीडियाच्या जगात वावरताना अशी एक गोष्ट नाही जी जगापासून आपण लपवून ठेवतो. इथे गावपातळीतील एखादी व्यक्ती क्षणामध्ये प्रसिद्ध होते. आज स्त्री पुरुष असा भेद उरलेला नाही. दोघेही नोकरी करतात आणि आपला संसारासाठी झटतात. पूर्वी महिला वर्ग घरात राहायच्या आणि पुरुष मंडळी कामावर जायचे. त्या काळात शिक्षणाचाही अभाव होता. महिलांना लिहता वाचताही येतं नव्हतं. पण आज हे चित्र बदललं आहे. 

आजची स्त्रीही शिक्षणासोबत स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. पण आजही खेड्यागावात अजूनही अशा महिला आहेत. ज्या शिक्षकलेल्या नाहीत आणि नवऱ्यावर अवलंबून असतात. अशामध्ये सोशल मीडियावर एका काकू व्हिडीओ प्रत्येकाने बघावं आणि त्यातून शिकावं असा आहे. या मराठी काकूने प्रत्येकाला एक सकारात्मक आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सांगितला आहे. 


या मराठी काकूने दिलेला मोलाचा सल्ला हा प्रत्येक महिलेने बघितला पाहिजे आणि त्यातून जीवन घडवायला पाहिजे. एका व्यक्तीने त्या पाणीपुरी विकणाऱ्या काकूचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, ''शिकलेल्या बायकांनी नोकरी करावी पण आम्ही अडाणी बायका काय करणार? प्रपंच असं सांगतो की दोन चाकांनी संसार पुढे न्यायाचा असतो बघ, म्हणून नवऱ्याच्या जीवावर बसून खायचं नाही बरं का. बाई माणसाने पण राबत राहिलं पाहिजे, आपल्याला जे काम जमतं ते करून चार पैसे कमवले पाहिजेत समजलं ना'' (Maharashtra Sangali Marathi Kaku Inspiration To All Women Viral Video social media trending now  every should watch)


या काकूने सांगितलेले एक एक शब्द खरं होते आणि प्रेरणादायी आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर @Sandeshdaniel या यूजर्सने त्याचा अकाऊंटवर शेअर केला आहे. त्याने सांगितलं आहे की, ही महिला सांगतीतील पार्वती काकू असून ती पाणीपुरी विकते आणि आपल्या नवऱ्याला संसारात हातभार लावते. 

पार्वती काकूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर यूजर्सला प्रचंड आवडतोय आहे. हा व्हिडीओ प्रत्येकाने पाहवा असा आहे. जिथे आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरुन नवरा बायकोचे भांडण होतं आणि वेळ घटस्फोटापर्यंत जाते तिथे संसार म्हणजे काय हे प्रत्येकाने समजून घ्यावं. 

Read More