Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सातारकरांचा नाद करायचा नाय! पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचला परीक्षेला, पाहा Launch होतानाचा Video

Boy Reached Exam Hall with Paragliding: अरं बाssssssप... असं कुठं असतं का? सातारकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.   

सातारकरांचा नाद करायचा नाय! पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचला परीक्षेला, पाहा Launch होतानाचा Video

Boy Reached Exam Hall with Paragliding: परीक्षा... नुसतं नाव घेतलं तरी अनेकांच्याच पोटात भीतीनं गोळा येतो. अभ्यास झालेला असो वा नसो, परीक्षेला वाटणारी भीती ही कोणालाही चुकलेली नाही. परीक्षेदरम्यान वेळेचत पोहोचलणं असो किंवा अखेरच्या मिनिटापर्यंत पुस्तकातील परिच्छेदांची घोकंपट्टी करणं असो प्रत्येक विद्यार्थी त्याच्या परीनं या परीक्षेसाठी तयारी करत असतो. साताऱ्यात मात्र एका विद्यार्थ्यानं नादच केला. कारण, हा पठ्ठ्या परीक्षेला पोहोचला तोच पॅरार्लायडिंग करत. 

इन्स्टाग्रामवर या तरुणाच्या अनोख्या प्रवासाचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. जो पाहून अनेकांना हे जे काही घडलं त्यावर विश्वासच बसेना. प्राथमिक माहितीनुसार हा 19 वर्षीय समर्थ नावाचा तरुण बीकॉमचा विद्यार्थी असून, तो उसाच्या रसाचा गाडाही चावलतो. त्याची पहिल्या सत्रातील परीक्षा नियोजित होती. प्रत्यक्षात परीक्षा रद्द झाली होती. पण, हॉलतिकीटावर त्याचा तपशील अपडेट न झाल्यानं परीक्षा वेळेआधीच होणार आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. 

मित्रांनी फोन करत त्याच्याशी संपर्क साधत 'आज' परीक्षा असल्याचं सांगितलं आणि परीक्षेसाठी काही मिनिटं शिल्लक असतानाच त्यानं 15 किमीचं अंतर दूर करण्यासाठी वेगळी वाट निवडली. साताऱ्यातील वाई इथं असणारा पसरणी घाट ओलांडून परीक्षास्थळी पोहोचण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ तरी गेला असता. हा वेळ वाचवण्यासाठी समर्थ पॅराग्लायडिंग इंस्ट्रक्टरकडे पोहोचला आणि त्यांच्याकडे मदत मागितली. पुढच्या पाचव्या मिनिटाला हा तरुण अख्खाच्या अख्खा घाट उतरून थेट परीक्षेच्या ठिकाणी पोहोचला होता. 

तिथं त्याचे मित्र आधीच पेन वगैरे परीक्षेसाठी लागणारं साहित्य घेऊन हजर होते. अखेर पॅराग्लायडिंग करत तो महाविद्यालयाच्या मैदानावर लँड झाला आणि वर्गाच्या दिशेनं त्यानं तडक धूम ठोकली. समर्थच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर कल्ला केला असून, सातारकरांचा नाद करायचा नाय... असंच नेटकरीसुद्धा म्हणत आहेत. 

हेसुद्धा वाचा : मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update 

 

कुठं आहे पसरणी घाट? 

वाई-महाबळेश्वर मार्गावर पसरणी घाटाची वाट असून, या घाटातून धोम धरण, पसरणी गाव, पांडवगड, वाई शहराचं दृश्य पाहायला मिळतं. पसरणी घाटात पाचगणी-दांडेघर असे टप्पे असून, पावसाळ्यात निसर्गाची विविधरुपी उधळण घाटातून पाहायला मिळते.

Read More