Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही', या रागातून नातू आजीशी असा वागला...

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही' यावरुन नातवाने आजीवर असा राग व्यक्त केलाय, की...

'माझं लवकर लग्न का लावून देत नाही', या रागातून नातू आजीशी असा वागला...

सोलापूर : माझं लवकर लग्न का लावून देत नाही, या कारणाने आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नातवाविरुद्ध सोरापूरमधील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सलीम जहाँगीर नदाफ असं आरोपीचं नाव असून तो सोरापूरातील आदर्श नगर, शेळगी इथ आपल्या आजीसोबत राहात होता. सलीम नदाफ हा कर्नाटकात जिरंकली इथं बिगारीचं काम करतो. त्याचं लग्न करण्यासाठी मुली पाहण्याचे काम सुरू होतं.

आजी मालनबी हसनसाहब नदाफ यांनी सलीम नदाफ याला सोलापुरात मुलगी पाहण्यासाठी बोलावून घेतलं होतं. त्यानुसार तो सोलापुरात आला आणि काही ठिकाणी त्याने मुली पाहिल्या. मात्र,लग्न जुळत नसल्याने तो तणावात आला होता.

दरम्यान,आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या असताना सलीम नदाफ घरी आला आणि त्याने आजीला तू माझे लग्न का लावून देत नाही, उगाच मला कर्नाटकातून येथे का बोलावून घेतली,असा जाब विचारला.

दोघांत बोलणे झाल्यानंतर सलीम नदाफ यानं आजीच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केला. यामध्ये मालनबी नदाफ या जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता,त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फिरोज शकुर नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम नदाफ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सलीमला पोलिसांनी अटक केली असून जिल्हा न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Read More