Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

SSC Result 2019 : उद्या लागणार दहावीचा निकाल

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

SSC Result  2019 : उद्या लागणार दहावीचा निकाल

Maharashtra SSC Result 2019, मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या म्हणजेच ८ जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या तारखेची अफवा पसरली होती. पण आता शनिवारी ८ जूनला १० वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागाच्या निकाल दुपारी १ वाजता विविध संकेतस्थळावर पाहता येणार आहे. खालील संकेतस्थळाववर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

राज्यभरातून तब्बल १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ४ हजार ८७४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली आहे.

SSC महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी

www.mahresult.nic.in

www.maharashtraeducation.com

www.results.mkcl.org

mahahsscboard.in

 

Read More