Maharashtra Board 10th SSC Result Out: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावीचा एसएससी बोर्डाचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल नेहमीप्रमाणेच कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागात 98.82 टक्के निकाल लागला असून सर्वाधीक कमी निकाल 90.78 टक्के हा नागपूर विभागाचा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 1.71 टक्क्यांनी घसरला असून काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 285 इतकी आहे.
दहावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींची एकूण टक्केवारी 96.14 तर मुलांची 92.31 टक्के इतकी आहे. त्याचबरोबर विशेष म्हणजे काठावर पास होणाऱ्या मुलांची संख्यादेखील जास्त आहे. संपूर्ण राज्यभरातून फक्त 35 टक्के मिळालेले विद्यार्थी 285 आहेत. त्यामुळं एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 35 टक्के म्हणजे काठावर पास असा शेरा देण्यात येतो. त्याचबरोबर यंदा राज्यात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर, 75 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी 4 लाखांच्यावर आहेत.
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10 टक्के आहे.
पुणे -59
नागपूर-63
संभाजीनगर-26
मुंबई-67
कोल्हापूर-13
अमरावती-28
नाशिक-9
लातूर-18
कोकण-0
पुणे -13
नागपूर-3
संभाजीनगर-40
मुंबई-8
कोल्हापूर-12
अमरावती-11
नाशिक-2
लातूर-113
कोकण-9
राज्यात सर्वाधिक निकाल सिंधुदुर्ग - 99.32
सर्वात कमी निकाल गडचिरोली - 82.67