Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

SSC Results Link : आज दहावीचा ऑनलाईन निकाल, कुठे, कसा पाहाल निकाल

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. 

SSC Results Link : आज दहावीचा ऑनलाईन निकाल, कुठे, कसा पाहाल निकाल

मुंबई : आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती मिळाली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलेला आहे. (Maharashtra SSC Result Link, Where and how to check class 10th students result )  50 गुण नववीच्या परीक्षेच्या आधारावर, 30 गुण सराव परीक्षा  आणि 20 गुण अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आहेत.

 राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. सन २०२१ च्या दहावीच्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांचे गुण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. निकालाची प्रिंटही विद्यार्थ्यांना घेता येईल. यंदा करोनामुळे ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे निकाल कसा लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. http://result.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल कसा पाहाल...

fallbacks

fallbacks

fallbacks

Read More