Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

१ लाख श्रमिकांसाठी धावली 'लालपरी'!

एसटीच्या लालपरीने गेल्या ६ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील १ लाख ६ हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे.

१ लाख श्रमिकांसाठी धावली 'लालपरी'!

मुंबई : एसटीच्या लालपरीने गेल्या ६ दिवसांमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील १ लाख ६ हजार मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचवलं आहे. मजुरांना याठिकाणी पोहोचवण्यासाठी ७,७२७ बस चालवण्यात आल्या. एसटी चालक, इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही बहुमोल कामगिरी करून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. 

२३ मार्च म्हणजेच लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून अत्यावश्यक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतुकीची सेवा एसटी मार्फतच पुरवण्यात येत आहे. ९ मेपासून मजुरांना त्यांच्या गावाला पोहोचवण्यासाठी एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. या मजुरांना कुटुंबांसह त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवण्यात येत आहे. 

सोमवारपासून बेस्ट बससेवा बंद होण्याची चिन्हं

Read More