Maharashtra Unseasonal Rain : उन्हाळा सुरु झाला असल्या तरी राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपीट, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्याला बसला आहे. (maharashtra unseasonal rain video)
पुढचे दोन दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातल्या धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात वादळी वा-यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
8 April, येत्या 2 दिवसात राज्यात पिवळा इशारा दर्शविल्याप्रमाणे गडगडाटी वादळाशी संबंधित हलक्या-मध्यम पावसाची शक्यता
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 8, 2023
ऑरेंज अलर्ट मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता.
तिस-या दिवसापासून आतल्या काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता
-IMD@imdnagpur @RMC_Mumbai pic.twitter.com/9QAsknpQyJ
नाशिकच्या सटाण्यात गारपीट झालीय. सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह बोराच्या आकाराच्या गारा बसरल्याने करंजाड, अखातवाडे, भुयाने, बिजोटे, पारनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. डाळिंब, काढणीला आलेला कांदा, फळबागा, भाजीपाला पिकांना या पावसाचा फटका बसलाय. (maharashtra unseasonal rain news weather updates warning rain next two days maharashtra houses damages crops in marathi)
महाराष्ट्र के नाशिक जिले में आज दोपहर बाद आए तूफान और बारिश से भारी नुकसान हुआ है।
— Arvind Shukla (@AShukkla) April 8, 2023
कई जगह अनार और अंगूर के बाग उजड़ गए हैं। कई जगह पशुओं की मौत हो गई है।
प्याज की फसल को भी भारी नुकसान है@PotliNews#Maharashtra #maharashtranews #nashik #rain #strome pic.twitter.com/0gsEkHAwes
बीड जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं अतोनात नुकसान झालंय. तब्बल एक तास इथं मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शेतीपिकाचं प्रचंड नुकसान झालय.. वादळी वा-यामुळे मोठ मोठी झाडं उन्मळून पडली आहेत तर काही घरावरील पत्र उडून गेलेत. केज तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला. यात अंबा ,कांदा ,उन्हाळी सोयाबीन,टरबूज, खरबूजासह भाजीपाला शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
अहमदनगर शहरासह परिसरामध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झालीय. आठ वाजेच्या सुमारास पाऊस आणि गारा पडण्यास सुरुवात झाली, तब्बल 15 ते 20 मिनिटे शहरामध्ये गारपीट झाली. शहरातील काही भागात गारांचा खच साचला. गारपिटीमुळे बहरात आलेल्या फळबागांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मक्याच्या बिया इतक्या आकाराच्या गारा पडल्या आहेत.
नगर ... pic.twitter.com/jpIzJ04wa6
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 8, 2023
अकोला जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला... यामुळे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फळबागेचे प्रचंड मोठं नुकसान झालंय.... यामध्ये चिकू, आंबा, लिंबू फळबागेचे मोठे नुकसान झालंय....
हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली... त्यामुळे हळद पीक काढणी सुरू असताना पावसाचं घोंगावत असलेलं संकट शेतक-यांना पुन्हा अडचणीत टाकणारं आहे... यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जातेय...
माळशिरस तालुक्यातील गिरवी, इस्लामपूर या भागात मेघगर्जनेसह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. इस्लामपूर येथे झाडावरती वीज पडून झाडांनी पेठ घेतला. पावसामुळे विविध गावांमध्ये पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळालं.
परभणी जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी वीज कोसळली असून यात दोघांचा मृत्यू झालाय. शेतात काम करत असतांना एका महिलेचा आणि पुरुषाचा वीज अंगावर कोसळल्यानं मृत्यू झाला. तर काही जनावरं देखिल मृत्यूमुखी पडली.