Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी

Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे.   

Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी

Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : राज्यात सध्या राजकीय वातावरणात असंख्य घाडमोडी घडतानाच सणवारांनाही याच राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे. अगदी पवारांची बारामतीसुद्धा इथं अपवाद ठरलेली नाही. कारण, यंदा पहिल्यांदाच बारामतीत आज दोन्ही पवारांचा पाडवा वेगळा होत आहे. 

दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये समर्थकांशी भेटीगाठी सुरु केल्या असून, त्यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबीयांनीसुद्धा व्यासपीठावर उपस्थित राहत समर्थकांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. दिवाळी पाडव्याच्या दिवशी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी काटेवाडील जमण्यास सुरुवात केली. 

फक्त काटेवाडीतच नव्हे, तर दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं बारामतीमध्ये पवार समर्थक आणि चाहत्यांचा स्नेहमेळा होत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावर्षी बारामतीत दोन वेगवेगळे कार्यक्रम होत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटी बरोबरच पवार कुटुंबीयांमधील फूट हे त्यामागचं कारण आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

दिवाळी पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत एकत्र येतं. बारामतीकरांसह राज्यभरातून आलेले कार्यकर्ते शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत येतात.  गोविंद बागेची ही परंपरा बनलेली आहे. असं असताना या वर्षी बारामतीच्या काटेवाडीत आणखी एक स्नेहमेळा होत आहे. इथल्या पवार फार्मस् म्हणजेच अजित पवारांच्या शेतातील घरासमोरही अजित पवार कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांचा पाडवा साजरा होत आहे. 

 

हेसुद्धा वाचा : निवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा

आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच अजित पवारांनी दिवाळी पाडव्याचा वेगळा मांडव टाकलाय. तिथं गोविंद बागेत शरद पवारांचा पाडवा साजरा होत आहे. शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोंविद बागेत मोठी गर्दी केलीय. राज्यभरातील कार्यकर्ते बारामतीत दाखल होत आहेत. शरद पवारांसह सुप्रिया सुळे कार्यकर्ते शुभेच्छा स्वीकारत आहेत. 

Read More