Maharashtra Weather: राज्यात मार्च आणि मे मध्ये कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तर यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यात तापमानाचा पारा हा दहा वीस नव्हे तर तब्बल सव्वाशे वर्षातील उच्चांक असलेला उन्हाळा ठरलाय.त्यामुळे वाढत असलेला उन्हाळा ही आता चिंतेची बाब बनलीय का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
राज्यासह देशभरातील उष्णतेचा पारा हा दिवसात दिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्याने वातावरणात प्रतीचक्रवात स्थिती निर्माण झाल्याने यंदा राज्यात उन्हाळा जास्त जाणवतो. पुण्यात तर फेब्रुवारीमध्ये सरासरी तापमानाचा उच्चांकत सव्वाशे वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक 39 कमाल तापमानवाढीचा चटका जाणवलं होता तर सोलापूर,रत्नागिरी मध्ये 38 कमान तापमानाचा उच्चांक नोंदविण्यात आलाय तर सांगली.. सातारा. उस्मानाबाद आणि अकोला मध्ये 37 कमाल तापमानाची नोंद झालीय.
6 March, पुढील ४,५ दिवस कोकणात काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. ९ मार्च दक्षिण कोकणात व १० मार्च मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या लाटेचा सतर्कतेचा इशारा आहे. कृपया दररोजच्या अपडेट्स पहा व परिस्थितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. @RMC_Mumbai @SDMAMaharashtra pic.twitter.com/IxR1GBAcJc
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 6, 2025
मुंबई कमाल तापमान 35.3 आणि किमान 21.5
नागपूर कमाल तापमान 34.2 आणि किमान 13.9
नाशिक कमाल तापमान 36.6 आणि किमान 12.4
कोल्हापूर कमाल तापमान 36.0 आणि किमान 19.7
सोलापूर कमाल तापमान 38.0 आणि किमान 19.8
रत्नागिरी कमाल तापमान 38.1 आणि किमान 16.2
सातारा कमाल तापमान 37.0 आणि किमान 15.0
सांगली कमाल तापमान 37.4 आणि किमान 17.4
मालेगाव कमाल तापमान 34.0 आणि किमान 14.0
जळगाव कमाल तापमान 34.3 आणि किमान 9.8
परभणी कमाल तापमान 35.4 आणि किमान 14.1
अकोला कमाल तापमान 36.5 आणि किमान 14.6
याचाच अर्थ पुण्यासह इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी कमाल तापमानात 2.6 अंश सेल्सिअसची वाढ झाली. हवामानातील प्रतिचक्रवातामुळे उत्तरेकडून येणारे थंड हवेचे वारे रोखले गेले. त्याचा हा परिणाम आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ही चिंतेची बाब असल्याचं हवामान तज्ञांचं मत आहे.
फेब्रुवारी प्रमाणेच मार्च आणि मे महिना देखील उष्णतेचा असणार आहे. त्यामुळे उन्हाची बाधा होऊ नये याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे. नाहीतर डी हायड्रेशन किंवा उलट्या जुलाब होऊन मोठ्या प्रमाणात अशक्तपणा येऊ शकतो, असे डॉक्टरांनी म्हटलंय.
सध्या जगभरातील तापमानात वाढ होत आहे. पर्यावरणीय बदलांचा हा परिणाम आहे. उत्तर माहिती असूनही त्याला रोखायचं कसं असा प्रश्न जगाला पडलाय.