Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा तडाखा वाढल्याचं पाहायला मिळत आहे.   

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; धुळीच्या वादळाचाही इशारा... हवामान आणखी किती धडकी भरवणार?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात सध्या तापमानवाढीचा तडाखा बसत असून, त्यामुळं नागरिकांची प्रचंड होरपळ होताना दिसत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीच्या माहितीनुसार महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उकाडा आणखी वाढणार असून उष्णतेची लाट तीव्र होताना दिसेल. जिथं तापमानाचा आकडा 42 अंशांपर्यंत पोहोचून या दाहकतेत आणखी भर टाकेल. 

महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भ आणि कोकणात तापमानवाढीचा फटका बसणार असून, त्याच धर्तीवर या भागांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या या भागांमध्ये तापमान 39 ते 40 अंशांदरम्यान राहील. कोकणात प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नागपूर तर, मराठवाड्यातही काही ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आल्यानं आतापासूनच वाढेला हा उकाडा मे महिन्यात रौद्र रुप धारण करणार, याचीच भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतही परिस्थिती वेगळी नसून शहरात प्रामुख्यानं किनारपट्टीनजीक राहणाऱ्या नागरिकांना दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. 

कुठे देण्यात आलाय वादळाचा इशारा? 

महाराष्ट्रासह मध्य भारतापासून उत्तर भारतापर्यंतच्या राज्यांमध्ये उकाडा वाढत असतानाच पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि बिहार इथं पुढील आठवडाभरात जोरदार वारे आणि धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामुळं मध्य भारतापासून पूर्वोत्तर भारतापर्यंत तापमानात दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्राच्या विदर्भ पट्ट्यामध्ये 14 मार्च, ओडिशात 16 मार्च, झारखंडमध्ये 16 मार्चपर्यंत तर पश्चिम बंगालमध्ये 18 मार्च रोजी उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

 

Read More