Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पुन्हा काळे ढग, विजा अन्... जोरदार पाऊसधारा; हवामान विभागाकडून राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांसाठी इशारा?

Maharashtra Weather News : राज्यात पावसानं काही अंशी उसंत घेतली असली तरीही हाच पाऊस आता पुन्हा एकदा राज्यात काळ्या ढगांची दाटी करत हजेरी लावण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पुन्हा काळे ढग, विजा अन्... जोरदार पाऊसधारा; हवामान विभागाकडून राज्याच्या कोणत्या जिल्ह्यांसाठी इशारा?

Maharashtra Weather News : पावसाच्या विश्रांतीमुळं आणि अधूनमधून येणाऱ्या श्रावणसरींमुळं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 48 तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये तर उन्हाळी उकाडा दिसून आला. मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा हवामानात काही प्राथमिक स्वरुपातील बदल अपेक्षित असून आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

जोरदार पावसामुळं समोरचं दिसेनासं होणार?

एकिकडे राज्याच पारा 32 अंशांहून पुढे गेल्यानं उकाडा पुन्हा त्रास देऊ लागलेला असतानाच दुसरीकडे कोकणातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांना मात्र पाऊस झोडपण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामानाच्या याच स्थितीमुळं या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा,सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्येसुद्धा जोरदार पावसाची हजेरी असेल. तर, पुणे आणि कोल्हापुरातील घाट क्षेत्रांवर पावसाळी ढग गर्दी करून तुरळक सरींची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान  विभागाच्या माहितीनुसार तामिळनाडूनजीकच्या समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असल्या कारणानं अरबी समुद्रात पूर्वमध्येपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला अहे. ज्यामुळं राज्यात एकिकडे उकाडा तर, दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा यांसारख्या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.

पुढील 24 तासांत कोणत्या भागांना पाऊस झोडपणार?

हवामान विभागानं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये सांगली, लातूर, धाराशिव, नांदेड या भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी असेल तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर इथं विजांच्या कडकडटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

FAQ

महाराष्ट्रात सध्या हवामानाची स्थिती काय आहे?
सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ झाली आहे, आणि अधूनमधून श्रावणसरी येत आहेत. मुंबई, ठाणे, पालघर यांसारख्या भागांमध्ये उन्हाळी उकाडा जाणवत आहे. मात्र, गुरुवारपासून हवामानात बदल होऊन आकाश अंशत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.

कोणत्या भागांना पावसाचा यलो अलर्ट?
कोकणातील दक्षिण भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये सातारा, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड यांचा समावेश आहे.

पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये जोरदार पाऊस?
पुढील 24 तासांत सांगली, लातूर, धाराशिव आणि नांदेड येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

Read More