Maharashtra weather News : हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तूर्तास जोरदार पावसाचा इशारा नसून काही भागांमध्ये तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी पारा तीस अंशांपलिकडे पोहोचत असल्या कारणानं पावसाच्या या दिवसांमध्ये उन्हाळा सुरू झाल्याचीच अनुभूती होत आहे. अशा या संपूर्ण वातावरणादरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ भाग मात्र अपवाद ठरत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्यानं धाराशिव, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील. तर, उर्वरित जिल्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज आहे.
मुंबई आणि कोकणामध्ये प्रामुख्यानं किनारपट्ट भागांमध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवू लागला आहे. ज्यामुळं या पावसाळी उन्हाळ्यानं नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम केल्याचं पाहायाला मिळत आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत असून या बदलत्या हवामानात नागरिकांना आरोग्य जपण्याचा सल्लाही दिला जात आहे.
10 Aug:१३/८ सुमारास बंगालच्या वायव्य उपसागरात कमीदाबाच्या प्रणालीची शक्यता. राज्यात १२-१४ दरम्यान विदर्भ,कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. १४ ला मध्यमहाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 10, 2025
विदर्भात १३-१४ अतिमुसळधार ऑरेंज अलर्ट.
राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. pic.twitter.com/CnHe5LaTQJ
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या माहितीनुसार 13 ऑगस्टच्या सुमारास बंगालच्या उपसागरात वायव्येस कमी दाबाच्या प्रणालीची शक्यता आहे. ज्यामुळं राज्यात 12 ते 14 ऑगस्टदरम्यान विदर्भ,कोकणात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून 13-14 ऑगस्टसाठी विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेव्हा आता या पूर्वानुमानानुसार पाऊस खरंच हजेरी लावतो, की यावेळी चकवा देतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
महाराष्ट्रात सध्या हवामानाची स्थिती काय आहे?
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्याच्या बहुतांश भागांत जोरदार पावसाचा इशारा नाही. काही भागांत तापमानवाढ झाली असून, दुपारच्या वेळी तापमान 30 अंशांपेक्षा जास्त होत आहे, ज्यामुळे पावसाळ्यातही उन्हाळ्याची अनुभूती होत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
धाराशिव, सोलापूर, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज आहे.
मुंबई आणि कोकणात हवामान कसे आहे?
मुंबई आणि कोकणात, विशेषतः किनारपट्टी भागात, हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडा जाणवत आहे. यामुळे पावसाळी उन्हाळ्याची अनुभूती होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.