Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचं आजचं हवामान?

Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.   

मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचं आजचं हवामान?

Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली आहे. जुलैमध्ये पावसाने सरासरी ओलांडल्यानंतर ऑगस्ट महिना कोरडाच गेला आहे. राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या होत्या त्या वगळता मुसळधार पाऊस झालाच नाहीये. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आठवड्याअखेर पावसाचा जोर वाढू शकतो. शुक्रवारअखेरीस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शनिवार-रविवार पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आज गुरुवारी मुंबईत आणि राज्यातही फारसा पाऊस होण्याची शक्यता नाहीये. गुरुवारी पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याकाळात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो. घाटमाथ्यावरही आज पाऊस होऊ शकतो. पुणे, रायगड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

दक्षिण कोकणात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये शुक्रवार व शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवार आणि शनिवार पावसाचा जोर अधिक असू शकतो. अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

भारतीय हवामान विभागाने ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळं आता सप्टेंबर महिन्यात तरी पावसाचा जोर कामय असेल अशी शक्यता आहे. 

Read More