Maharashtra Weather News : हवामान विभागानं 24 तासांपूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातून पाऊस मोठ्या सुट्टीवर जाण्याच्या तयारीत असल्याची चिन्हं होती. मात्र आता हाच पाऊस विदर्भ आणि नजीकच्या भागांसह कोकणातसुद्धा आणखी काही दिवस मुक्कामी असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा पावसाची जोरदार हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवत अधूनमधून येणाऱ्य़ा सरींमुळं अनेकांचाच गोंधळही उडू शकतो ही बाब नाकारता येत नाही. (Maharashtra Weather News konkna Vidarbha and mumbai to receive moderate monsoon rainfall climate in my city latest update)
मागील 24 तासांमध्ये (Mumbai Weather) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी पावसानं उसंत घेतली होती. मात्र दिवस मावळतीला गेल्यानंतर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींनी शहराला ओलचिंब केलं. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह आकाश सामान्यत: ढगाळ राहील असा अंदाज आहे.
संपूर्ण विदर्भासह राज्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी असेल असा इशारा देत या भागांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यानच्या काळात लख्ख सूर्यप्रकाश इतक्यात दिसणार नसला तरीही ढगांच्या आडून डोकावणाऱ्या सूर्यकिरणांचा काहीसा लपंडाव मात्र पाहायला मिळू शकतो ही बाब नाकारता येत नाही.
सध्यच्या घडीला अरबी समुद्रापासून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्यामुळं कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भावर पावसाचं सर्वाधिक सावट पाहायला मिळत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात बुधवारी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, कोकणापासून गोव्यापर्यंत पावसाची अपेक्षित हजेरी पाहायला मिळेल, तर गुरुवारनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत ही धरणं 90% पेक्षा अधिक भरली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू मोठ्या प्रमाणात सोडण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने पुणेकरांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. नदीपात्रातील ब्लू लाईन क्षेत्रात नागरिकांनी जाऊ नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 29, 2025
https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/GPvYrh5LRg
राज्यात जुलै महिन्यात सुरुवातीचे 15 दिवस फारसा पाऊस झाला नसला तरीही 20 जुलैपासून राज्यात सुरू झालेल्या पावसामुळे ही घट भरून निघाली. आता ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसासाठी अनुकूल हवामान निर्माण होण्याचा अंदाज असून, राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.