Maharashra Weather News : देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक परिस्थिती पाहायला मिळत असून अतीव उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. इथं महाराष्ट्रातही घाटमाथ्यावरील बहुतांश भागांमध्ये दरड कोसळण्याचं सुत्र सुरूच असून घाट क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रशासनानं सावधगिरीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांसाठी पूर्व विदर्भात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain Updates) जिथं प्रामुख्यानं चंद्रपूर, गडचिरोली भंडारा आणि गोंदिया येथे पावसाचा रेड अलर्ट लागू असेल. ज्यामुळं काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर, नागपुरात रात्रीपासूनच पावसाची रिपरीप सुरूच असून, नागपूर आणि वर्धा इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शुक्रवारी राज्यात (Mumbai Rain) मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पर्जन्यमानाची एकंदर स्थिती पाहता रायगड, रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करत (Mumbai High Tide) दुपारी 12.40 वाजता मोठी भरती येणार असून, 4.66 मीटरच्या लाटांनी समुद्र खवळणार असल्याचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Thunderstorm accompanied with lightning ,gusty winds reaching 30 to 40 kmph and Light to Moderate rainfall very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 24, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या." pic.twitter.com/peewjtbTUp
राज्यातील (Pune, Satara Rain Updates) पुणे घाट, सातारा घाट, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर गडचिरोलीत रेड अलर्ट तर ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, वर्ध्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामुळं हवामान खात्याने पावसाबाबत दिलेल्या रेड अलर्टच्या धर्तीवर बहुतांश शहरं आणि जिल्ह्यांतील शाळा- महाविद्यालयं, खाजगी कोचिंग क्लासेस, अंगणवाड्याना शुक्रवारी सुट्टी जाहीर करत नागरिकांनी अतिवृष्टीच्या या प्रसंगी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.