Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशारा

Maharashtra Weather Update: कुठे उन तर कुठे उन्हाची काहिली असा अजब खेळ सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. 

 कुठे उन्हाची काहिली तर कुठे पावसाचा इशारा; आज महाराष्ट्रातील हवामान कसे असेल? वाचा IMD चा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा 40च्या पार गेला आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. 

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने यलो अलर्ट कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि त्यालगतच्या परिसरात समुद्र सपाटीपासून १.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळं विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळं राज्यात दमट आणि ढगाळ वातावरण आहे आणि म्हणूनच उन्हाची काहिली वाढत आहे. 

आज मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे. 

राज्यात अकोला येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. अकोल्यात शनिवारी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अमरावती, धुळे, जळगाव, यवतमाळ, सोलापूर, नागपूर येथे ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. 

Read More