Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Maharastra politicians wife Mangalagaur Video : श्रावण म्हटलं की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ डोळ्यासमोर उभा राहतो. महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात झाली आणि त्यापाठोपाठ व्रत, सण, समारंभ साजरे करण्यासही सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय. महिला मंडळ आता जोरदार पद्धतीने सणासुदीची उधळण करताना दिसत आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या सौभाग्यवतींनी मंगळागौरच्या निमित्ताने फेर धरल्याचं पहायला मिळतंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हर्षवर्धन पाटील यांची लेक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांची पत्नी अंकिता पाटील ठाकरे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

काय म्हणतात अंकिता पाटील ठाकरे?

सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळूनी पारंपरिक थोर…..

मुंबई येथे आयोजित मंगळागौर कार्यक्रमाप्रसंगी सौ. शर्मिलाकाकी ठाकरे, सौ. सुनेत्राकाकी पवार, सौ. वृषालीताई शिंदे यांच्यासह मंगळागौर खेळ खेळण्याचा आनंद घेतला, अशी पोस्ट अंकिता पाटील ठाकरे यांनी केली आहे.

पाहा VIDEO

दरम्यान, अंकिता पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, मंगळागौरीच्या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे, अंकिता पाटील ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सून वृषाली शिंदे यांनी सहभाग घेत सुनेत्रा पवारांसोबत एकत्र फुगडी घालण्याचा देखील आनंद लुटल्याचं पहायला मिळतंय. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसत आहे.

Read More