Mahendrasingh Dhoni Acting Field: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वा हंगाम सुरु आहे. सर्वांचा लाडका महेंद्रसिंग धोनी रिटायर्ड होणार? अशी चर्चा या हंगामाच्या सुरुवातीपासून होती. या हंगामात धोनीची बॅट काही तळपताना दिसत नाहीय. तरीही धोनीला पाहण्यासाठी चाहते नेहमी गर्दी करत असतात. आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्मात नसलेला धोनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार का? असा प्रश्न चाहच्यांना पडलाय.
एमएस धोनी अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएल खेळतोय. एवढेच नाही तर ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर धोनी चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्वही करतोय. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये एक विजय आणि एक पराभव स्वीकारलाय. असे असले तरी तो सोशल मीडियावर अजूनही चर्चेचा विषय आहे.
सध्या महेंद्रसिंग धोनी खास कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलाय. कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात स्थान असलेला धोनी लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करू शकतो. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने त्याचा एक व्हिडिओ शेअर केलाय. संपूर्ण प्रकरण काय आहे? जाणून घ्या.
करण जोहरने त्याच्या पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवरुन एमएस धोनीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये धोनी रोमॅंटीक लूकमध्ये दिसतोय. त्याच्या हातात लव्हचा फुगा आहे. हातात फूगा घेऊन तो एक डायलॉगदेखील बोलतोय. तेव्हापासून धोनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असा अंदाज त्याचा चाहते लावत आहेत.
करण जोहरने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'नाटकीय ड्रमरोल, कृपया! एमएस धोनी आमचा सर्वात नवा प्रेमी आहे. पण थांबा, माहीचे त्याच्या बाईकवरील प्रेम काही नवीन नाही. अद्भुत कथेसाठी गल्फ प्राइड आणि पुनीतचे आभार. प्यूअर सिनेमॅटिक जादू!'
एमएस धोनीचा हा व्हिडिओ म्हणजे एका कंपनीची जाहिरात आहे. ही व्हिडिओ क्लिप बॉलीवूड चित्रपटातील वाटत असली तरी ते तसे नाही. त्यामुळे धोनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. असे असले तरी माही एक टीव्ही जाहिरात करतोय. कॅप्टन कूलने ही जाहिरात गल्फ प्राइड या तेल कंपनीसाठी बनवली आहे.