Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पनवेलमधील सोसायटीत PFI जिंदाबादचे स्टिकर्स लावणाऱ्याला अटक; खुलासा ऐकून पोलिस चक्रावले

पनवेल सेक्टर 19 मधील निलआंगन सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांतल्या वादात, दहशत माजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.  

पनवेलमधील सोसायटीत PFI जिंदाबादचे स्टिकर्स लावणाऱ्याला अटक; खुलासा ऐकून पोलिस चक्रावले

Panvel PFI : पनवेल मध्ये पीएफआय जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होती.  पनवेलमधील एका गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार घडला होता. PFIचे स्टिकर लावून सुतळी बॉम्ब ठेवणा-याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सोसायटीचा सदस्य आहे. सोसायटीच्या आवारात   PFIचे स्टिकर लावून सुतळी बॉम्ब ठेवल्याची कबूली आोरपीने दिली आहे. हे कृत्य का केले याचा खुलासा देखील त्याने केला आहे. त्याचा खुलासा ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. 

नेमका काय प्रकार घडला

25 जून रोजी हा प्रकार घडला होता. नवीन पनवेल सेक्टर 19 मधील नीलागण सोसायटीच्या आवारात PFI जिंदाबाद असे मेसेज लिहिलेले स्टीकर्स आणि सुतळी बॉम्ब नागरिकांना आढळले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी पाहणी करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. 

असा सापडला आरोपी 

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे स्टिकर, दोन सुतळी बॉम्ब आणि एक विझलेली अगरबत्ती ठेवून रहिवाशांमध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी नवीन पनवेल सेक्टर-19 मधील निलआंगन सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. सोसायटीतील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये असलेल्या वादातून त्याने हा प्रकार केल्याचे समोर आलेय. या प्रकरणाचा तपास सुरु असताना सोसायटीचा एक पदाधिकारी पोलीस तपासाचा सतत मागोवा घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सदर पदाधिकाऱ्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, सोसायटीचे पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये वाद असल्याने रहिवाशांना त्रास व्हावा या हेतूने त्यानेच सदरचे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती खान्देश्वर पोलिसांनी दिली.

Read More