Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Video: दारूसाठी जीवघेणी धडपड, लोखंडी ग्रिलमध्ये अडकलं डोकं, पाहणाऱ्यांना हसू आवरेना

'दारू का चक्कर बाबू भैया', दारु घेण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्ती लोखंडी ग्रिलमध्ये अडकला. पुढे जे झालं ते पाहून हसू आवरणार नाही.

Video: दारूसाठी जीवघेणी धडपड, लोखंडी ग्रिलमध्ये अडकलं डोकं, पाहणाऱ्यांना हसू आवरेना

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक अजब आणि हास्यजनक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 'दारू का चक्कर बाबू भैया…' या मजेशीर शीर्षकासोबत एका व्यक्तीचा दारू मिळवण्यासाठीचा हट्ट आणि त्याचा परिणाम काय झाला हे पाहून सध्या या व्हिडीओची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, एक व्यक्ती दारूचे दुकान बंद असताना देखील दारूच्या दुकानात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी तो तिथे लावण्यात आलेल्या लोखंडी ग्रिलमधून डोके आत घालून दारूची बाटली घेताना दिसत आहे. अशातच त्याचे डोके लोखंडी ग्रिलमध्ये अडकते. 

नेमकं घडलं काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दारु घेण्यासाठी हद्द पार करताना दिसत आहे. दारूचे दुकान बंद असताना देखील त्याला दारु पिण्याची इच्छा इतकी झाली की त्याने चक्क दुकानापुढे असणाऱ्या लोखंडी ग्रिलमधून आतमध्ये डोके घातले आणि दारू घेतली. पण झालं असं की त्याने डोके ग्रिलमध्ये आत घातले खरे मात्र, ते बाहेर निघता निघेना. अनेक वेळा प्रयत्न करून देखील ते बाहेर निघेना. त्यावेळी त्याच्या जवळ असणाऱ्या काही नागरिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने त्याचे डोके बाहेर काढण्यात यश आलं. 

सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले. मात्र, त्यामधील काहीजण त्याला मदत करताना दिसले तर काही जणांनी त्याचा हा मजेदार व्हिडीओ शूट केला. 

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया चर्चेत 

सध्या हा व्हिडीओ पाहून हसावं की रडावं? हा प्रश्न वापरकर्त्यांना पडला आहे. दारु मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात हे आजपर्यंत ऐकलं होत मात्र, ते आज बघायला देखील मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी दारू बंदीची मागणी केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला दिलेले कॅप्शन देखील चर्चेत आलं आहे. ज्यामध्ये दारू का चक्कर बाबू भैय्या असं म्हटलं आहे. दारूच्या आहारी गेलेले अनेक लोक फक्त स्वत:चं नाही तर आपल्या कुटुंबाचंही नुकसान करतात. या व्यक्तीचा हा व्हिडीओ विनोदी वाटत असेल पण तो समाजासाठी एक इशारा देखील ठरू शकतो. 

Read More