Manikrao Kokate : राज्याचा राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना विधानपरिषदेत मोबाइलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना भोवला आहे. माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आग्रह धरला होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल करण्याबाबात हे पत्र असल्याच सूत्रांनी सांगितलं आहे.
मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्या अशी मागणी जोर धरत होती. पण कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेतलं जाणार आहे. त्यांचा खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात माणिकराव कोकाटे यांचे खाते बदल करा अशी मागणी करण्यात आली होती. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात येणार आहे, सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान सध्या क्रीडा खातं हे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात आज सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक झाली. याच बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जर माणिकराव कोकाटे करुन कृषी खाते काढून घेतल्यास हे खातं मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतल्याच सूत्रांनी सांगितलं आहे.