Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

संघ मुख्यालयात भाजप आमदारांचे बौद्धिक

 रेशीमबागेत आमदारांना बौद्धिक देण्यात आलं.

संघ मुख्यालयात भाजप आमदारांचे बौद्धिक

नागपूर : नागपूरच्या संघ मुख्यालयात आज भाजप आमदारांना बौद्धिक देण्यात आलं. रेशीमबागेत आमदारांना बौद्धिक देण्यात आलं. पक्षांतर केलेले राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, प्रवीण दरेकरही संघाचं बौद्धिकला उपस्थिती लावली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आशिष शेलारही संघाच्या बौद्धिकाला उपस्थित होते. 

दरवर्षी हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या आमदारांसाठी संघाकडून बौद्धिक दिलं जातं. रेशीमबागेत येऊन आनंद वाटल्याची प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय. तर संघानं देशप्रेम आणि त्याग शिकवला असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईकांनी दिलीय.

ज्या विशिष्ट वातावरणात आपण वाढलोय आज त्यातून बाजूसा येऊन संघाच्या कार्यालयात येण्याची माझी पहिली वेळ आहे. पण मी एकदा भूमिका स्वीकारली आहे त्यामुळे संकोच करण्याचे कारण नाही असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मला नवीन वाटतय सर्व पण संकोच वाटत नाही. नवी भूमिका करायला मिळते यात आनंद असल्याचे ते म्हणाले. 

Read More