Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अन्यथा मुंबईत मुंग्यांसारखे....', मनोज जरांगेंकडून सरकारला 29 ऑगस्टचा अल्टिमेटम; काय आहेत मागण्या?

Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईत मुंग्यासारखे जमा होवू असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.   

'अन्यथा मुंबईत मुंग्यांसारखे....', मनोज जरांगेंकडून सरकारला 29 ऑगस्टचा अल्टिमेटम; काय आहेत मागण्या?

Manoj Jarange Maratha Reservation:  मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत धडकणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.. मुंबईत आल्यानंतर आरक्षण घेऊनच परत येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 29 ऑगस्टच्या आत मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईत मुंग्यासारखे जमा होवू असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. सर्व आमदारांसोबत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. 


मागण्या पूर्ण करा अन्यथा मुंबईमध्ये मराठे धडकणार

जरांगे पाटील मुंबईत गेल्यास आम्हीदेखील मुंबईत जाणार

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं होतं. सरकारच्या प्रतिनिधींनी समजूत काढल्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित करत सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यास मुंबईत धडकणार असून विजयी होऊनच परतणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.  गरिबांच्या लेकरांना मोठं करणार असंही ते म्हणाले आहेत. 


जरांगेंच्या कोणत्या मागण्या-

- मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्या नोंदी सापडल्या आहेत. 

- त्यामुळे मराठा आणि कुणबी एक असल्याचा कायदा पारीत करावा

- सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी करावी

- हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं


सोलापूर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. 2024 च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना जरांगे फॅक्टरचा फायदा झाला होता. त्यामुळे प्रणिती यांनी मनोज जरांगे यांचे आभार मानले. यावेळी जरांगे यांनी प्रणिती शिंदेंना मराठा आरक्षणा संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं. आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना समजावून सांगा हेच सांगितलं असं ते म्हणाले आहेत. 

जरांगे पटलांनी 29 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. दरम्यान यावेळेत मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांनी पुन्हा एकदा मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे
पाटलांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read More