Marathi Bhasha Din 2025: दरवर्षी 27 फेब्रुवारीचा दिवस मराठी दिवस (Marathi Bhasha Din) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील मराठी जनांसाठी हा दिवस आपण मराठी असल्याचं अभिमानाने मिरवत सांगण्याचा हक्काचा दिवस मानला जातो. मात्र आपल्याप्रमाणे केवळ मराठीबद्दल अभिमान न बाळगता आपणही मराठी भाषेसाठी काहीतरी भरीव काम केलं पाहिजे या हेतूनेच स्वातंत्र्यवीर सावकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द दिले. भाषा समृद्ध करण्याच्या हेतूने सावरकरांनी दिलेले मराठी प्रतिशब्द आज आपण दैनंदिन आयुष्यात इतक्या सहजपणे वापरतो की या शब्दांचे जनक सावरकर असल्याची आपल्याला कल्पनाही नसते.
सावरकरांनी दिलेले अनेक शब्द आज मराठी लोकांकडून अगदी सहज वापरले जातात. या शब्दांना आज दैनंदिन आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र सावरकरांनी दिलेले शब्द कोणते? याबद्दल अनेकांना माहिती नसते. म्हणूनच आज मराठी भाषा दिनानिमित्त सावकरांनी इंग्रजीतील शब्दांना मराठी भाषेत दिलेल्या शब्दांची यादी आम्ही देत आहोत. चला तर पाहूयात सावरकरांनी नेमक्या कोणत्या शब्दांची भर घालून आपली मराठी अधिक समृद्ध केली ते...
गणसंख्या (कोरम)
स्तंभ ( कॉलम)
दिनांक (तारीख)
क्रमांक (नंबर)
बोलपट (टॉकी)
नेपथ्य
वेशभूषा (कॉश्च्युम)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
चित्रपट (सिनेमा)
मध्यंतर (इन्टर्व्हल)
उपस्थित (हजर)
प्रतिवृत्त (रिपोर्ट)
वेतन (पगार)
नगरपालिका (म्युन्सिपाल्टी)
महापालिका (कॉर्पोरेशन)
महापौर (मेयर)
पर्यवेक्षक ( सुपरवायझर)
विश्वस्त (ट्रस्टी)
त्वर्य/त्वरित (अर्जंट)
मूल्य (किंमत)
शुल्क (फी)
हुतात्मा (शहीद)
निर्बंध (कायदा)
शिरगणती ( खानेसुमारी)
विशेषांक (खास अंक)
सार्वमत (प्लेबिसाइट)
झरणी (फाऊन्टनपेन)
नभोवाणी (रेडिओ)
दूरदर्शन (टेलिव्हिजन)
दूरध्वनी (टेलिफोन)
ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर)
विधिमंडळ ( असेम्ब्ली)
अर्थसंकल्प (बजेट)
क्रीडांगण (ग्राउंड)
प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल)
प्राध्यापक (प्रोफेसर)
परीक्षक (एक्झामिनर)
शस्त्रसंधी (सिसफायर)
टपाल (पोस्ट)
तारण (मॉर्गेज)
संचलन (परेड)
गतिमान
नेतृत्व (लिडरशीप)
सेवानिवृत्त (रिटायर)
धिक्कार (शेम)
अहवाल (रिपोर्ट)
प्रतिवेदक (रिपोर्टर)
प्रयाग (अलाहाबाद)
पश्चिम समुद्र, सिंधुसागर (अरबी समुद्र)
राजस्व (महसूल)
बुद्धी, मती, प्रज्ञा (अक्कल)
दिग्दर्शक (डायरेक्टर)
उपस्थित (हजर)
बलात्कार (जबरी संभोग)