Marathi Bigg Boss Refrance In Maharashtra Politics: तुम्ही 'बिग बॉस मराठी सिझन 5' हा शो पाहत असाल तर 'बाईssss' हा शब्द अनेकदा तुमच्या कानावर पडला असेल. या शोमधील स्पर्धक निकी तांबोळीच्या तोंडी सातत्याने असलेला हा शब्द आणि तो उच्चारण्याची तिची खास शैली सोशल मीडियावरही चांगलीच चर्चेत आहे. अगदी दहीहंडीच्या गाण्यांमध्येही डिजेंनी हा शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं आहे. कार्यक्रमाच्या टीझरमध्येही हा शब्द अनेकदा दिसून आला आहे. विशेष म्हणजे आता या शब्दाचा वापर करत उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाच्या फायर ब्रॅण्ड नेता सुषमा अंधारे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते केशव उपाध्येंमध्ये जुंपल्याचं चित्र 'एक्स'वर (आधीचं ट्वीटरवर) पाहायला मिळालं. झालं असं की सुषमा अंधारेंनी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेलं एक होर्डींग रस्त्यासमोर लावल्याचं दिसत आहे. होर्डिंगवर फडणवीसांच्या तोंडी, "दर्देदार रस्ते अथवा स्ट्रीट टॅक्स नाही, हा माझा शब्द आहे," असं वाक्य दिसत आहे. मात्र याच होर्डिंग समोरच्या रस्त्यावर मोठे खड्डे असून त्यामधून अनेक गाड्या अगदी काही फुटांपर्यंत उडत असल्याचं दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ एडिटेड असल्याचा दावा या पोस्टला रिप्लाय करत केशव उपाध्येंनी केला आहे.
*दर्जेदार रस्ते आणि फडणवीस यांचा शब्द, परिवर्तन तर होणारच..*@Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm pic.twitter.com/O3uSjplG20
— SushmaTai Andhare (@andharesushama) September 19, 2024
केशव उपाध्येंनी हा व्हिडीओ चीनमधील असून तो चार वर्षांपूर्वीचा असल्याचं अगदी युट्यूब व्हिडीओची लिंक पोस्ट करत म्हटलं आहे. "सुषमाताई, हरकत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षामध्ये खोटारड्यांना दुसरा काही धंदा तसाही उरला नाही. त्यात तर तुमची नवी संगत तुम्हाला तेच सतत शिकवत असणार," असा टोला लगावला आहे. तसेच आपल्या पोस्टमध्ये केशव उपाध्येंनी, "असो. हाच व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आणि चीनमधला आहे, तुम्ही तोही उलटा केला आणि तसाच वापरला. अर्थात उबाठाचे उलटे डोके तरी कसे चालणार?" असा चिमटाही सुषमा अंधारेंना काढला आहे.
सुषमाताई ,
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 19, 2024
हरकत नाही. उबाठा मध्ये खोटारड्यांना दुसरा काही धंदा तसाही उरला नाही.
त्यात तर तुमची नवी संगत तुम्हाला तेच सतत शिकवत असणार.
असो. हाच व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आणि चीनमधला आहे, तुम्ही तोही उलटा केला आणि तसाच वापरला.
अर्थात उबाठाचे उलटे डोके तरी कसे चालणार?
ही घ्या… https://t.co/tHpbe8wfS5
केशव उपाध्येंच्या या पोस्टवर सुषमा अंधारेंनी निकी तांबोळी 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्ये वापरते तो 'बाईsss' शब्द वापरत रिप्लाय केला आहे. "बाईssss काय हा प्रकार..?" असं म्हणत सुषमा अंधारेंनी, "ट्रोलधाडीमध्ये तुम्हीही सामील व्हावं हे काही पटलं नाही. तुम्ही प्रवक्ते आहात. वाघपणाचा आव आणणारे ढोंगी नाही. कधी राहुल गांधी कधी उद्धव ठाकरे यांचे व्हिडिओ एडिट करून पसरवणे हा धंदा विचीत्र' काथे'कुट न् चिरकुट खळखळ करणाऱ्यांना शोभतो तुम्हाला नाही," असा टोमणा केशव उपाध्येंना लगावला आहे.
बाईssss काय हा प्रकार..?
— SushmaTai Andhare (@andharesushama) September 20, 2024
ट्रोलधाडी मध्ये तुम्हीही सामील व्हावं हे काही पटलं नाही.. तुम्ही प्रवक्ते आहात. वाघपणाचा आव आणणारे ढोंगी नाही.. कधी @RahulGandhi कधी @OfficeofUT यांचे व्हिडिओ एडिट करून पसरवणे हा धंदा विचीत्र' काथे'कुट न् चिरकुट खळखळ करणाऱ्यांना शोभतो तुम्हाला नाही. https://t.co/CyFsPV3WaA
दरम्यान, यावर केशव उपाध्ये काय रिप्लाय करतात याकडे दोन्हीकडील समर्थकांचं लक्ष लागून राहिलं आहे.