Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...म्हणून UP, बिहारसहीत अर्धा डझन राज्यातील विद्यार्थी अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत शिकतायेत मराठी

Marathi Language Study In Uttar Pradesh: उत्तरेमधील राज्यांमध्ये मराठी शिकवा अशी मागणी हिंदी आणि मराठी वादादरम्यान करण्यात आलेली असतानाच उत्तर प्रदेशमधून खरोखरच मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी बातमी समोर येत आहे.

...म्हणून UP, बिहारसहीत अर्धा डझन राज्यातील विद्यार्थी अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत शिकतायेत मराठी

Aligarh Muslim University Marathi Language Study: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून मराठी-हिंदीचा वाद पेटला असतानाच उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषेकडे वळत असल्याचं आशादायी चित्र पाहायला मिळत आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठात उत्तर भारतातील विद्यार्थी मराठी भाषा शिकत असून शेकडोच्या संख्येनं या ठिकाणी परराज्यातील विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम निवडला आहे. महाराष्ट्रात रोजगाराचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर देशाची आर्थिक राजधानी आणि 'स्वप्नांचे शहर' मुंबईत जाऊन मोठा माणूस बनण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी शिकत आहेत.

मराठी सर्वात सोपी भाषा

एकीकडे मराठी आणि हिंदी हा वाद सुरू असताना हे चित्र सुखावह असल्याचे अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रभारी डॉ. ताहेर पठाण यांनी एका प्रतिष्ठित माध्यम समुहाशी संवाद साधताना सांगितले. "भारतातील सर्वांत सोपी भाषा मराठी आहे. संस्कृत भाषेच्या हिंदी आणि मराठी या दोन जुळ्या मुली. हिंदी आणि मराठीत 50 टक्के सारखे शब्द आहेत. ज्या राज्यात आपण राहतो तिथली भाषा आपल्या यायलाच हवी. महाराष्ट्रात इंग्रजी शाळांचे अतिक्रमण होत आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे. मराठीचे जतन व्हायला हवे," असं मत अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रभारी  डॉ. ताहेर एच. पठाण यांनी नोंदवलं आहे.

पंजाब, राजस्थान, बिहारसहीत या राज्यातील विद्यार्थी शिकत आहेत मराठी

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागात या वर्षी 410 विद्यार्थी मराठी शिकत आहेत. ज्यात जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणाशी देणेघेणे नाही. त्यांच्यासाठी रोजगार महत्त्वाचा आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठामध्ये 1988 मध्ये मराठी विभाग सुरू झाला. 2015 ते 2025 या 10 वर्षांच्या काळात 400 विद्यार्थ्यांपर्यंतचा आशादायी टप्पा पूर्ण झाला. अनेक विद्यार्थी मराठी भाषेत पीएच.डी. करत आहेत.

मराठीकडे विद्यार्थी आकर्षित होण्याची महत्त्वाची कारणं कोणती?

रोजगार, संशोधन, शिक्षण ही मराठी शिकण्यामागील कारणे आहेत. याशिवाय चित्रपटसृष्टीचे मुंबई, तर कलेचे पुणे माहेरघर आहे. अभिनेते होण्याचे स्वप्न पाहणारे, अनुवाद, लेखन क्षेत्रात जाण्याची इच्छा असलेले विद्यार्थी मराठीला प्राधान्य देत आहेत. हिंदी-मराठीतील संत, दलित साहित्यातील साधर्म्यामुळेही काही विद्यार्थी हे भाषेचे प्रेम म्हणून शिकतात. एएमयूचे अभ्यासक्रम एम.ए, बीए, डिप्लोमा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम, अनुवाद डिप्लोमा, पीएच.डी. 

Read More