Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'महाराष्ट्रात मराठी भाषाच...'; मराठी एकजुटीबद्दल असदुद्दीन ओवेसीचं मोठं वक्तव्य

Asaduddin Owaisi on Marathi language : हिंदी भाषेसंदर्भातील शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. त्यानंतर हा विजय मराठी माणसांच्या एकजुटीचा असल्याच म्हटलं जातंय. अशातच या एकजुटीबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केलं. 

'महाराष्ट्रात मराठी भाषाच...'; मराठी एकजुटीबद्दल असदुद्दीन ओवेसीचं मोठं वक्तव्य

Asaduddin Owaisi on Marathi language : इयत्ते पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेत समावेश करण्यासंदर्भात सरकारने दोन शासन निर्णय काढले होते. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे आणि मोठे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. मराठी माणसासाठी हे दोन्ही भाऊ 2005 नंतर एका जीआरविरोधात 5 जुलैला मोर्च्याची हाक दिली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह मराठी माणूस या जीआरविरोधात एकत्र आला. हे पाहून पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन शासन निर्णय रद्द केले. त्यानंतर मराठी एकजुटीबद्दल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं वक्तव्य केलं. 

'महाराष्ट्रात मराठी भाषाच...'

स्थानिक स्वराज्य स्वस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने परभणी येथे एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी परभणी येथे आले होते,त्यांची दर्गा रोडवर एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती,यावेळी त्यांनी मराठी माणसांनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात उभ्या केलेल्या लढ्याचे कौतुक करीत मराठी माणसांच्या एकजुटीमुळे सरकारला हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा जीआर माघे घ्यावा लागल्याचे ओवेसी म्हणाले.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी भाषाच चालेल, हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हणत एकजूट दाखवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. हिंदी भाषा लादू पाहणाऱ्या फडणवीस सरकारला जीआर मागे घ्यावा लागला, ही एकतेची ताकद आहे. महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मराठी जनतेचे कौतुक केले. देशात एक भाषा, एक विचारधारा ही संघाची विचारसरणी आहे. पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये ती चालू शकत नाही, असेही ओवेसी म्हणाले.

'अजित पवार तुम्हाला खांदा द्यायला येणार नाही'

परभणीतील या सभेत त्यांनी अजित पवारांच्या पक्षात गेलेल्या आजी माजी नगसेवकांचाही खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, थोड्याश्या आमिषाला बळी पडून तुम्ही अजित पवारांच्या पक्षात गेलात पण यामधून तुम्ही गाडी घेऊन शकाल, थोडे कपडे ही घ्याल, पण हीच गाडी आणि कपडे घेऊन तुम्ही समाजात बदनामच होणार आहात. जेव्हा तुमचं निधन होईल त्यावेळी अजित पवार तुम्हाला खांदा द्यायला येणार नाही. ओवेसी सारखाच कुणी तरी खांदा देऊन स्मशान नेईल अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी अजित पवारांच्या पक्षात गेलेल्या आजी माजी नगसेवकांवर केली. यावेळी लोकांनी एमआयएमच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन ही ओवेसी यांनी केले.

Read More