Raj Thackeray-Uddhav Thackeray Vijayi Melava: मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 19 वर्षांनी एकत्र येत आहेत. त्यामुळं मनसैनिक आणि शिवसैनिक या विजयी मेळाव्यासाठी उत्सुक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झाले आहेत. फक्त मुंबईतूनच नव्हे तर देश-विदेशातून मराठीजन या मेळाव्यासाठी आले आहेत. खास अमेरिकेतून विजयी मेळाव्यासाठी एक व्यक्ती मुंबईत आला आहे. रवी मराठे असं यांचे नाव आहे.
रवी मराठी हे अमेरिकीतील व्हर्जिनिया येथील रिचमंड या गावात राहतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते खास अमेरिकेतून मुंबईत आले आहेत. या निमित्ताने झी 24 तासशी त्यांनी खास बातचित केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी मनाचा हुंकार उमटला जातोय याचा आम्हाला तिकडच्या लोकांनादेखील अभिमान आहे. मी या घटनेचा साक्षीदार झाल्याचे भाग्य मिळाले यासाठी मी स्वतःला सुदैवी समजतो. मला असं म्हणायचंय महाराष्ट्र मराठी भाषा संस्कृतीविषयी परत जागा झालाय.त्याचा एक कुठेतरी मराठी संस्कृतीला फायदा होईल. अमेरिकीतील मराठी मनाला या घटनेचा नक्कीच आनंद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या विजयी मिळण्यासाठी नवी मुंबईतून शिवसैनिक व मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तसंच, विजयी मेळाव्यासाठी त्यासाठी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे आणि परिसरातील अनेक कार्यकर्ते हे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून मुंबईकडे निघाले आहेत. दोन्ही ठाकरे एकत्रित येत असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाच वातावरण पहायला मिळत आहे.
वरळी डोममध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट. बॅाम्ब डिटेक्शन स्कॅाड पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसंच, डॉग स्कॉड मार्फत सर्वत्र तपासणी सुरू आहे.