Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मराठी सिंघम बिहारच्या राजकीय आखाड्यात,मराठमोळ्या शिवदीप लांडेंची 'अशी' असेल नवी इनिंग!

Shivdeep Lande Political Inning: एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवदीप लांडेंचा प्रवास थक्क करणारा आहे. 

मराठी सिंघम बिहारच्या राजकीय आखाड्यात,मराठमोळ्या शिवदीप लांडेंची 'अशी' असेल नवी इनिंग!

Shivdeep Lande Political Inning: धडाडीचे IPS अधिकारी अशी ख्याती मिळवलेले शिवदीप लांडे यांनी खाकी सोडून खादीची वस्त्र परिधान केली आहेत. मराठमोळ्या शिवदीप लांडे यांनी IPS अधिकारी म्हणून बिहार राज्यात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. आता शिवदीप लांडे आपली नवी इनिंग सुरु करत आहेत. 

डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून कारकीर्द गाजवलेल्या शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू झालीय. शिवदीप लांडे यांची राजकीय आखाड्यात एन्ट्री झालीय. शिवदीप यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या पक्षाची स्थापन केली आहे. बिहार विधानसभेच्या सर्व 234 जागा लढण्याची घोषणाही लांडे यांनी केलीय. तरुणांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी पक्ष काढल्याचं शिवदीप लांडे यांनी म्हटलंय.

एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवदीप लांडेंचा प्रवास थक्क करणारा आहे. गरिबीतून कष्टानं पुढे आलेल्या शिवदीप यांनी आयपीएसची पदवी मिळवली. आपल्या डॅशिंग आणि आक्रमक स्टाईलनं शिवदीप यांनी अल्पावधीतच बिहारच्या पोलीस दलात आपला वेगळा ठसा उमटवला.

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप वामनराव लांडे हे 2006 बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी होते. त्यांनी बिहार केडरमध्ये सेवा बजावली. शिवदीप लांडे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी अकोल्यातील सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतलं. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यांनी 2 फेब्रुवारी 2014 रोजी माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून ते आयपीएस सेवेत दाखल झाले. पाटणा इथं पोलीस अधीक्षक असताना कामगिरीमुळे लोकप्रिय झाले. बिहारमधील लोकांनी त्यांना 'दबंग', 'सिंघम' आणि 'सुपरकॉप' अशी नावं दिली. शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी आयपीएस सेवेतून राजीनामा दिला शिवदीप लांडे यांच्या रुपानं मराठी सिंघम आता बिहारच्या राजकीय आखाड्यात उतरलाय. गेल्यावर्षी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनीही बिहारमध्ये जनसुराज पक्षाची स्थापना केली. आता शिवदीप लांडेही बिहारच्या राजकीय वर्तुळात नशीब आजमावणार आहेत.

Read More