Trending Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे आपल्या डोळ्यात टचकन पाणी आणतात तर काही व्हिडिओ खळखळून हसवतात. तर, काही व्हिडिओतून मोलाचा संदेश दिला जातो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो. हा व्हिडिओ पाहून खऱ्या माणुसकीचे दर्शन घडते. व्हिडिओपाहून तुम्हीदेखील भावूक व्हाल. या व्हिडिओत एक 93 वर्षीय आजोबा त्यांच्या पत्नीला दागिना घेण्यासाठी शहरात येतात. पण त्यानंतर सोनाराच्या दुकानातील कर्मचाऱ्याने जे केलं ते पाहुन तुम्हीही म्हणाल हीच खरी माणुसकी.
एका सराफी पेढीवर एक 93 वर्षांच्या आजोबा आणि त्यांची पत्नी येतात. आजोबांनी त्यांच्या बायकोसाठी सोन्याची पोत घ्यायची आहे. ते म्हणत देखील आहेत बायकोसाठी ही पोत निवडली आहे आणि दुकानदाराला त्यांच्याकडे असलेले पैसे दाखवतात. आजोबांकडे फक्त अकराशे रुपये आणि काही चिल्लर असतात. हे पैसे ते दुकानदाराला देऊ करतात मात्र तो ते पैसे नाकारतो. दुकानदार आजोबांना त्यांचे पैसे परत देतो आणि सोबतच माळ आणि वाट्यादेखील त्यांच्याजवळच ठेवायला सांगतो.
दुकानदाराची ही माणुसकी पाहून दाम्पत्यही भारावून गेले. आजोबांच्या डोळ्यात पाणी आले. तरीही आजोबा पैसे घेण्यासाठी दुकानदाराला सांगताना दिसत आहे. मात्र दुकानदार पांडुरंगाचा आणि तुमचा आशिर्वाद सगळं कल्याणचं कल्याण आहे. असं म्हणत एकही रुपया घेत नाही. दुकानदाराच्या याच कृतीने सर्वांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागिना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं आहे.
बायकोला गळ्यातलं घेण्यासाठी ९३ वर्षीय आजोबा शहरात आले, पण दुकानदाराने जे केलं त्याने मन जिंकलं.
— khalid Chougle (@ChougleKhalid) June 16, 2025
Ye Hai Maharashtra Majha…
93 Ki Umar Me Apni Biwi Ko Gold Dilane Gaye Magar Paise Nahi Hai…
Tho Aise Me Jewelers Ne Sirf Un Ka Hi Nahi Pure Desh Ka Dil Jeet Liya… pic.twitter.com/mCP6TIb7ZT
ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पाडणार नाही तुमच्यासाठी सदैव प्रार्थना करू. खूप सुंदर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पाडणार नाही. तुमच्यासाठी सदैव प्रार्थना करू, खूप सुंदर तुमच्याकडून आदर्श घ्यायला हवा नक्कीच ते आजी-आजोबा किती सुंदर आणि खळखळून हसले तिथेच तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद, अशी कमेंट एकाने केली आहे. पहिल्यांदा सोनाराच्या दुकानात 24 कॅरेट सोनं पाहिलं बाबा, असं एकाने म्हटलं आहे. आजपर्यंतच सगळ्यात भारी व्हिडिओ... खरंच खूप छान...आजी बाबा तर भारीच पण दुकान मालकाला पण फुल respect... याला म्हणतात reel... समाजाला अशा प्रकारच्या reels दाखवण्याची गरज आहे...तेव्हा कुठे आपला समाज सुसंस्कृत होईल, असं एकाने म्हटलं आहे.