Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

MHDA चा 90202000000 रुपयांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये बांधणार19497 घरं

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात 'म्हाडा'च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.   

MHDA चा 90202000000 रुपयांचा सर्वात मोठा प्रोजेक्ट; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये बांधणार19497 घरं

MHDA House In Maharashtra : म्हाडा येत्या काही वर्षात राज्यभरात तब्बल 19 हजार 497 घरं बांधणार आहे. म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, नागपूर मंडळातर्फे ही घरं बांधली जाणार आहेत. यासाठी म्हाडाच्या अर्थसंकल्पात 9 हजार 202 कोटींची तरतूद करण्यात आलीय. यापैकी 5 हजार 199 घरं मुंबईत बांधली जातील. 

म्हाडाचा सन 2024-25 चा सुधारित आणि सन 2025-26 चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन 2025-26 च्या 15956.92  कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि  सन 2025-26 चा 10901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 

म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात 57449.49 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत 9902 सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट  आहे.  पुणे मंडळाअंतर्गत 1836सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. नागपूर मंडळाअंतर्गत 692 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे  छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत 1608 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.  नाशिक मंडळाअंतर्गत 91 सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. अमरावती मंडळाअंतर्गत 169 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.  म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.         

मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी 2800  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपये यासाह विविध योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

Read More