Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या सागरी सीमेत परप्रांतीय बोटींची घुसखोरी

 महाराष्ट्राच्या किनारी भागालगत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या तीन बोटींवर कारवाई 

महाराष्ट्राच्या सागरी सीमेत परप्रांतीय बोटींची घुसखोरी

रत्नागिरी : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये कामधंद्याच्या निमित्ताने येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर नियंत्रण मिळवण सध्या तरी कठीण दिसतंय. आता ही घुसखोरी सागरी भागांतही पाहायला मिळतेय. राज्याच्या सागरी सीमेत परप्रांतीय बोटी घुसखोरी करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झालंय.  महाराष्ट्राच्या किनारी भागालगत अनधिकृत मासेमारी करणाऱ्या तीन बोटींवर कारवाई करण्यात आलीय. मत्स्यविभागानं ही कारवाई केलीय.

मत्स्यविभागाच्या गस्तीनौकेच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलीय. मंगलमुर्ती,रामेश्वरी आणि धर्मवंदन अशी दीव दमणमध्ये कारवाई केलेल्या बोटींची नावे आहेत.

मत्स्यविभागाची कारवाई 

रत्नागिरी जवळच्या दिपगृहासमोरील १३ वाव सागरी अंतरात या बोटी मच्छिमारी करत होत्या. सध्या कारवाई कलेल्या बोटींमधून काही टन मासे जप्त करण्यात आलेत.

पकडण्यात आलेल्या दिव दमणमधील नौकांवर पाच पट दंड आकारणीसाठी मत्स्यविभागाने प्रस्ताव तहसिलदारांकडे पाठवलाय.

३५ वावाच्या आत ट्रॉलर्सच्या माध्यमातून मासेमारीसाठी बंदी आहे. त्यामुळे मत्सविभागाने ही कारवाई केलीय.

Read More