Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Girish Mahajan : निखिल खडसेच्या मृत्यूची चौकशी करा, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी

निखिल खडसेंच्या (Nikhil Khadse) मृत्यूची चौकशी करा, अशी मागणी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलीय.

Girish Mahajan : निखिल खडसेच्या मृत्यूची चौकशी करा, मंत्री गिरीश महाजन यांची मागणी

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मुलाने आतम्हत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं म्हटलंय. निखिल खडसेंच्या (Nikhil Khadse) मृत्यूची चौकशी करा, अशी मागणीच महाजन यांनी केलीय. निखिल खडसे यांनी 1 मे  2013 रोजी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं होतं. (minister of medical education girish mahajan demanded to investigation of eknath khadse son nikhil khadse death mystrey)

महाजन काय म्हणाले?  

"मुलगा नसणं हे काही दुर्देव नाही. मला मुली आहेत हे माझं सुदैव आहे. पण माझा त्यांना प्रश्नय की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं?", असा सवाल महाजन यांनी खडसेंना केला.  

"मला हा विषय बोलायचा नाही. मात्र ते जर माझ्या मुलांबद्दल बोलत असतील, तर त्यांनाही एक मुलगा होता. त्याचं काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना झोंबेल. खडसेंच्या मुलाचा खून झाला की आत्महत्या, हे तपसणं गरजेचं आहे.  मला फार बोलायला लावू नका, यातच तुमचं भलं आहे", असा इशाराही महाजन यांनी यावेळेस दिला. 

खडसेंची प्रतिक्रिया

"मी माझ्या आयुष्यात इतक हलकट आणि नीच राजकारण पाहिलं नव्हतं. मी 40 वर्ष संस्कारी राजकारण केलं. गिरीश भाऊंना दुर्देवाने मुलगा नसल्याने त्यांना पुत्र नसल्याचं दु:ख माहिती नाही. माझ्या मुलाने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा मी 15-20 किमी दूर होतो. तेव्हा तिथे रक्षा होती. त्यामुळे गिरीश भाऊंचा रोख कोणाकडे आहे", असा सवाल खडसेंनी केला. दरम्यान महाजन यांनी केलेल्या या मागणीमुळे महाजन-खडसे यांच्यातील वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. 

Read More