Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोठी दुर्घटना टळली! रेल्वे रुळावर ठेवले दगड, अल्पवयीन मुलांचा खोडसाळपणा

डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान रुळावर दगड ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे

मोठी दुर्घटना टळली! रेल्वे रुळावर ठेवले दगड, अल्पवयीन मुलांचा खोडसाळपणा

डोंबिवली : डोंबिवली ते ठाकुर्ली स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळावर दगडं ठेवल्याचं आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिसांनी तपास करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. 

केवळ मस्ती म्हणून या मुलांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या कर्जत लोकलच्या मोटरमनला रुळावर दगड ठेवल्याचं लक्षात आलं. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ लोकल थांबवली आणि या बाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

लोहमार्ग पोलिसांनी गांभीर्य ओळखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुळावर एक मोठ्या आकाराचा आणि तब्बल 15 लहान दगडी ठेवण्यात आले होते. याप्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून त्याने खोडसाळ वृत्तीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read More