Nanded News : महाराष्ट्रात एक चमत्कारिक प्रकार घडला आहे. नांदडेमध्ये जमिनीतून निघाला लावा सदृश्य पदार्थ निघाला आहे. यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत. हा पदार्थ नेमका काय आहे याचा तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नांदेड जिल्हयातील एका शिवारात जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नायगाव तालुक्यातील इजतगाव शिवारात जमिनीतून लावा सदृश पदार्थ बाहेर पडला. रविवारी दुपारी ही घटना घडली. इजतगाव शिवारात डोंगराळ भागात एक विद्युत खांब आहे. खांबासोबत जमिनीत असेलल्या ताराजवळून अचानक हा पदार्थ बाहेर निघत होता. सुरुवातीला हा काळा पदार्थ उष्ण होता, त्यातून वाफाही निघत होत्या. हा काळसर पदार्थ वाळल्यानंतर कोळशा सारखा झाला.
दरम्यान या घटनेमुळे ग्रामस्थ संभ्रमात आहेत. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला माहिती दिली मात्र कोणताही अधिकारी ईथे फिरकला नाही. दरम्यान आकाशातील वीज या विद्युत खांबावर कोसळली असावी आणि त्या विजेचा डिस्चार्ज जमिनीत होऊन विजेच्या उष्णतेमुळे त्या ठिकाणचा दगड पिघळून अशा प्रकारे बाहेर पडला असावा असा अंदाज जानकरांनी व्यक्त केला आहे.
भंडारा जिल्ह्याच्या नांदोरा येथील महादेव कोरचम यांनी 2010 साली बांधलेल्या घराच्या खाली भुयारी मार्ग मिळाला आहे. घराच्या आत एक छोटासा खड्डा पडला होता. त्याला थोडंसं खोदला व बांबू घालून पाहिल्यावर बांबू आत पर्यंत गेला. शेवटी खोदकाम केले असता अचानक घराच्या खाली भुयारी मार्ग आढळून आल्याने गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन , पुरातत्व विभाग आणि तहसीलदार यांना दिली. प्रशासनाच्या वतीने भेट देण्यात आली असली तरी प्रशासनाच्या वतीने कुठलेही प्रकरणाचे घटनेबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र गावकऱ्यांच्या मते आधी तिथे विहीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी आता प्रशासनाच्या वतीने घराच्या आत मध्ये काय आहे त्याचं शोध घेण्यात येणार आहे