Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आमदार अनिल गोटे यांचा भाजपला आणखी एक धक्का

भाजपला कोंडीत पकडण्याची अजून एक संधी गाठली

आमदार अनिल गोटे यांचा भाजपला आणखी एक धक्का

धुळे : धुळ्यातले भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याची अजून एक संधी गाठली आहे. शहरात ज्या ठिकाणी त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार उभे नाहीत अशा पाच ठिकाणी त्यांनी शिवसेनेला समर्थन दर्शविले आहे. 5 पाच ठिकाणी ते शिवसेनेसाठी मत मागणार आहेत. भाजपाला सत्ते बाहेर ठेवणे आणि अद्दल घडवणे हा त्यामागे हेतू असल्याचे दिसून येत आहे. 

अनिल गोटे यांनी 74 पैकी 62 ठिकाणी उमेदवार दिले असून अन्य ठिकाणी त्यांनी आता शिवसेनेला समर्थन देऊन भाजपची अजून कोंडी केली आहे. भाजपा मात्र त्यांच्या या खेळीने घायाळ झाली असली तरी पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आमदार गोटेंनी दिलेल्या पाठींब्याचे शिवसेनेने स्वागत केले आहे.

Read More