Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

कल्याणमधील खड्ड्यांविरोधात रस्त्यावर यज्ञ, आमदार गणपत गायकवाडांचं अनोखं आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खड्डेमय रस्त्यावर भाजप आमदारांचे सदभावना यज्ञ करत उपरोधिक आंदोलन.

कल्याणमधील खड्ड्यांविरोधात रस्त्यावर यज्ञ, आमदार गणपत गायकवाडांचं अनोखं आंदोलन

आतिष भोईर, कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळी गावातील मुख्य रस्त्याची गेल्या पाच वर्षापासून दुरावस्था आहे. या रस्त्याच्या डागडुजी संदर्भात सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी होत नसल्याचं भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी आज या खड्डेमय रस्ता तसेच मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होम हवन करत उपरोधीक आंदोलन केलं. यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे याचा भूमिकेचा निषेध नोंदवला. 

शिवसेनेच्या नेत्यांकडून जाणून बुजून कामं रखडवली जात असल्याचा आरोप देखील या वेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

Read More