Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मुख्यमंत्री फडणवीस हे श्रीरामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर, चंद्रासारखे...' आमदाराकडून कौतुकाचा वर्षाव!

MLA Parinay Phuke On Devendra Fadanvis:   आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, सुर्य, चंद्राशी केलीय.

मुख्यमंत्री फडणवीस हे श्रीरामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर, चंद्रासारखे...' आमदाराकडून कौतुकाचा वर्षाव!

MLA Parinay Phuke On Devendra Fadanvis: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून ते 18 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात 'विकसित महाराष्ट्र @2047' साठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यावर चर्चा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर भर दिलाय. तसेच मेळघाटसारख्या भागात पाणीपुरवठ्यासाठी बंधारे बांधण्यासारख्या स्थानिक समस्यांवरही चर्चा झाली. विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. दरम्यान आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केलाय. हे करताना त्यांनी फडणवीसांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, सुर्य, चंद्राशी केलीय. काय म्हणाले परिणय फुके? सविस्तर जाणून घेऊया. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान, श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी असलेले, महादेवासारखी सहनशक्ती असलेले, सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखे शीतल असल्याचे विधान परिणय फुकेंनी केलंय. विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान परिणय फुके बोलत होते. फुके यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. मराठा साम्राज्याचे ऐतिहासिक नेते नाना फडणवीस हे त्यांच्या काळातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशीही फुकेंनी फडणवीसांची तुलना केली. फुके यांनी देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आणि नेतृत्वावर जोर देत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील यश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. फुके यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. 

विधानावर उलटसुलट चर्चा 

फुके यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक आणि काही प्रमाणात वादग्रस्त प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी याला त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक मानले, तर काहींनी याला राजकीय रणनीतीचा भाग म्हणून पाहिले. विरोधकांनी परिणय फुकेंच्या या विधानावर टीका केलीय. 

देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द 

देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबर 2024 पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि यापूर्वी 2014-2019 आणि 2019 मध्ये काही काळ या पदावर होते. ते नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून 2009 पासून आमदार आहेत आणि त्यांनी 1999-2009 दरम्यान पश्चिम नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रीपद स्वीकारले, जे शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्रातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. फडणवीस यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि जर्मनीतील DSE येथून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे.त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपाला 122 जागांवर विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि 47 वर्षांत प्रथमच पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आणि शेतकऱ्यांसाठी शेत रस्त्यांची समग्र योजना जाहीर केली.

Read More