Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Exclusive: 'भाजपाच्या ट्रॅपमध्ये मनसे अडकली', रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा, सांगितलं मराठी-हिंदी वादाचं खरं कारण

पुढे रोहित पवार म्हणाले की, ठाकरे कुटुंब जेव्हा मंचावर एकत्र येत होते तेव्हा वैक्तिगतरित्या त्याच स्वागत केलं. तुम्ही जर बघितलं दोन जण एकत्र येणं मला तरी असं वाटतं मनसेने आपलं महत्त्व वाढून घेतलं. त्यात तुम्ही बघितलं तर जीआर त्यांना मागे घ्यावा लागला. त्याचं संपूर्ण श्रेय सर्वसामान्य लोकांना, मराठी लोकांना जातं. या दोन बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना जातं. या दोन पक्षांचे हे 100 टक्के श्रेय आहे. पण भाजपला हेच पाहिजे होतं. 

Exclusive: 'भाजपाच्या ट्रॅपमध्ये मनसे अडकली', रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा, सांगितलं मराठी-हिंदी वादाचं खरं कारण

Rohit Pawar : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकत्र आलेत. 20 वर्षांनंतर दोन भावांना एकाच मंचावर ठाकरे कुटुंबाचे हे मनोमिलन राज्याने पाहिलं. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली. त्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी मोठं विधान केलं आहे. 'झी 24 तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत त्यांनी याबद्दल स्पष्ट सांगून टाकलं.  

ठाकरे बंधुंनंतर पवारांमध्येही मनोमिलन होणार का?

रोहित पवार म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार हे राजकीयदृष्टीकोनातून एकत्र येणार नाहीत. हे पवारसाहेबांनीही स्पष्टपणे सांगितलं आहे. आम्ही देखील आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की, आपल्याला लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. 

'मनसेच्या या कृत्याचा भाजपला फायदा!'

पुढे रोहित पवार म्हणाले की, ठाकरे कुटुंब जेव्हा मंचावर एकत्र येत होते तेव्हा वैक्तिगतरित्या त्याच स्वागत केलं. तुम्ही जर बघितलं दोन जण एकत्र येणं मला तरी असं वाटतं मनसेने आपलं महत्त्व वाढून घेतलं. त्यात तुम्ही बघितलं तर जीआर त्यांना मागे घ्यावा लागला. त्याचं संपूर्ण श्रेय सर्वसामान्य लोकांना, मराठी लोकांना जातं. या दोन बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना जातं. या दोन पक्षांचे हे 100 टक्के श्रेय आहे. पण भाजपला हेच पाहिजे होतं. 

भाजपने या परिस्थितीचा वापर करुन मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी किंवा मराठी भाषिक विरुद्ध परप्रांतीय असा एक वाद त्यांनी सुरु केला. त्यात झालं असं की केडिया नावाचे उद्योगपती आहेत, जे भाजपच्या विचाराचे आहेत. त्यांनी तो वाद सुरु केला. मग कोणी फोडलं त्यांचं ऑफिस मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं. मग नंतर कुठे कुठे फोडा फोडी झाली ती मनसेच्याच कार्यकर्त्यांनी केली. यातून भाजपला जे पाहिजे होतं, ते दुदैवाने विचार न केल्यामुळे किंवा वरुन आदेश न आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडाफोडी सुरु केली. 

या सगळ्यामुळे मुंबईचं वातावरण मराठी विरुद्ध परप्रातीय ते 100 टक्के झालं आहे. आता जर याचं समीकरण पाहिलं तर याचा फायदा नक्कीच काही प्रमाणात भाजपला येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत होणार आहे. शिवाय बिहारच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम दिसून येईल. भाजपकडे चाणक्य विचाराचे लोक खूप आहेत. ते असे चाल टाकतात म्हणजे ट्रॅप टाकतात. याच ट्रॅपमध्ये मनसे अडकली, असा आरोप रोहित पवार यांनी केला. तसंच राज ठाकरेंच्या मनसे पक्षालाही मुंबईत आपलं वचर्स्व दाखवायचं होतं. एका विशिष्ट परिसरात दाखवायचं होतं. याचा मनसेला याचा थोडा फार वैक्तिगत फायदा होऊ शकतो. 

Read More