Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

डोंबिवलीतील स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल ऐकून राज ठाकरे हसत म्हणाले, 'मी सुद्धा क्रिकेट...'

MNS Chief Raj Thackeray Shocked: डोंबिवलीमध्ये आयोजित या स्पर्धेसाठी राज ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी काय घडलं जाणून घ्या...

डोंबिवलीतील स्पर्धेच्या बक्षिसांबद्दल ऐकून राज ठाकरे हसत म्हणाले, 'मी सुद्धा क्रिकेट...'

MNS Chief Raj Thackeray Shocked: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी स्वत: राज ठाकरे काल कल्याणमध्ये पोहोचले होते. 'स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट चषक' स्पर्धेतील शनिवारच्या सामन्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली. राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. राज ठाकरेच्या हस्तेच सामन्याचा टॉस उडवण्यात आला. त्यानंतर खेळाडूंशी गप्पा मारताना राज ठाकरेंना या स्पर्धांसाठीच्या बक्षीसांबद्दल सांगितलं असता त्यांनी एक मिश्कील विधान केलं आणि सर्वच उपस्थित हसू लागले. 

जोरदार स्वागत आणि टॉस

डोंबिवलीतील हेडुटने येथील मैदानात राजू पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या 'स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट चषक' स्पर्धेतील सामने खेळवले जात आहेत. ही स्पर्धा 18 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून आज म्हणजे 2 मार्च रोजी स्पर्धेचा शेवटचा सामना. शेवटच्या सामन्याच्या एक दिवस आधीच राज ठाकरेंनी या स्पर्धेला प्रेक्षक म्हणून हजेरी लावली. स्पर्धेतील ठाणे रायगड विरुद्ध शेष भारत हा सामना पाहण्यासाठी राज ठाकरे आले होते. राज ठाकरे यांच्या आगमनानंतर मैदानात ढोल-ताशा पथकासह भव्य 'लेझर शो'चे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले तसेच सामन्याचा टॉस उडवण्याचा मानही त्यांना मिळाला.

खेळाडूंना मिळणारी बक्षिसं

नाणेफेक झाल्यानंतर खेळाडूंशी चर्चा करताना आयोजकांच्या टीममधील राज ठाकरेंची एका खेळाडूशी ओळख करुन दिली. त्यावेळेस स्पर्धेतील बक्षीसांसंदर्भात सांगताना चार चाकी गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचं आयोजक म्हणाला. तसेच सदर खेळाडूने पाच फोर व्हीलर जिंकल्याचंही आयोजकाकडून सागंण्यात आलं.

नक्की वाचा >> 'अडीच वर्षात टेंडर घोटाळे झालेत त्याची...', राज ठाकरेंच्या मनसेचा एकनाथ शिंदेंवर निशाणा; फडणवीसांचं कौतुक

राज नेमकं काय म्हणाले?

हे ऐकून राज ठाकरेंनी मिश्कीलपणे हसत, "पाच फोर व्हिलर!" असं म्हटलं. त्यानंतर निघता निघता राज यांनी, "मी सुद्धा क्रिकेट शिकायला पाहिजे होतं," असं म्हटलं. अशा स्पर्धांमध्ये खेळाडूंना दिली जाणारी पारितोषिके ही खरोखरच क्रिकेटचा करिअर म्हणून विचार करण्यासाठी चांगली असल्याचं राज यांना यामधून सूचित करायचं होतं. राज यांचं हे विधान ऐकून सर्वचजण हसू लागले.

Read More