Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गुजरातमधील भाजप आमदाराला शिकवला मराठीचा धडा, गुजराती पाटी आणि मग्रुरी दोन्ही उतरवली

Gujarati signboard controversy: भाजपच्या गुजरात मधील आमदाराने नवी मुंबई, सीवूड्स मधील पक्ष कार्यालयाची पाटी पुन्हा गुजराती करून मनसे ला डिवचले होते. मात्र ही पाटी उतरवून हा माज उतरवण्यात आलाय

गुजरातमधील भाजप आमदाराला शिकवला मराठीचा धडा, गुजराती पाटी आणि मग्रुरी दोन्ही उतरवली

Gujarati signboard controversy: एकीकडे राज्यात मराठी आणि हिंदीवरून मोठा वाद सुरू आहे. त्यातच नवी मुंबईमध्ये भाजपच्या गुजरातमधील एका आमदाराने संपर्क कार्यालयाची पाटी गुजरातीत लावून नवा वाद निर्माण केला होता... मात्र या गुजराती पाटीविरोधात मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी आक्रमक भूमिका घेतली.. आणि या गुजराती पाटीसह या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांची मग्रुरीही उतरवलीय..

गुजरातमधील भाजप आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जाडेजा यांनी नवी मुंबईतील त्यांच्या संपर्क कार्यालयावर गुजराती पाटी लावली होती आणि त्यावरून नवी मुंबईमध्ये भाषिक वाद निर्माण झाला होता. मनसेच्या इशा-यानंतर दोन दिवसांपूर्वी ही पाटी मराठी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा कार्यालयावर गुजराती पाटी लावून डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर मात्र या गुजराती आमदाराला मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हिसका दाखवला आणि पुन्हा एकदा गुजाराती पाटी उतरवायला लावली. ज्या पदाधिकाऱ्याने या संपर्क कार्यालयावर गुजराती पाटी लावली त्या पदाधिकाऱ्याला माफीही मागायला लावलीय. त्यासोबतच पोलीत ठाण्यात गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आलीय.

नवी मुंबईतील मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या इशाऱ्यानंतर गुजराती आमदाराच्या कार्यालयावरील गुजराती पाटी दोन दिवसांपूर्वी उतरवण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा गुजराती पाटी चढवण्यात आल्यानंतर संताप अनावर झाला. या गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांनी मराठी माणसाचा हिसका दाखवत ही गुजराती पाटी उतरवण्यात आली आणि ही गुजराती मग्रुरी उतरवण्यात आली. संपर्क कार्यालयावरील या गुजराती पाटीला स्थानिक भाजपनेही विरोध केलाय.. बोर्ड जर लावायचाच असेल तर तो मराठीतच असायला हवा अशी भूमिका भाजपनेही घेतलीय..

राज्यात सध्या हिंदीच्या मुद्द्यावरून वादंग पाहायला मिळतोय त्यातच गुजरातमधील आमदाराने मुजोरी करत नवी मुंबईमधील संपर्क कार्यालवर गुजराती पाटी लावली आणि यात हद्द म्हणजे काढलेली गुजराती पाटी दोन दिवसांत पुन्हा लावून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न गुजराती आमदाराच्या कार्यकर्त्यांनी केला. मात्र पुन्हा लावलेली गुजराती पाटी आणि आमदाराची मुजोरी उतरवण्यात आलीय..

Read More