Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'परवाच मी राजला फोन केला...' विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केला खुलाशा, 'आजपासून सुरुवात झालीये...'

Uddhav Thackeray Speech: तब्बल 19 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.   

'परवाच मी राजला फोन केला...' विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी केला खुलाशा, 'आजपासून सुरुवात झालीये...'

Uddhav Thackeray Speech: 'मी आता सगळ्यांना अवाहन करतोय. संयुक्त महाराष्ट्र समितीची वेळी एकजूट झाली होती तशी एकजूट सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनीदेखील एकत्र आले पाहिजे. ज्या महाराष्ट्रात तुम्ही जन्माला आलात तिची उघड उघड हे लोक धिंडवडे काढणार असतील आणि आपण पायघड्या घालणार असू तर असं षंडाचं जिणे जिण्यापेक्षा मेलेले बरं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आज वरळी डोम येथे शिवसेना-मनसे पक्षाचा विजयी मेळावा पार पडला. या वेळी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात भाजपला ठणकावले आहे. महाराष्ट्र हा शूरांचा वीरांचा आहे. दगडांचा आहे पण यांच्यासारख्या धोंडाचा नाहीये, अशा शब्दांत त्यांनी भाजपला डिवचलं आहे.


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, परवा मी राजला फोन केला जसा काही आपल्या पिक्चरचा प्रमियर आहे तसे सगळे विचारताहेत आज कसं येऊ. हा प्रमियर असेल पण आजपासून सुरुवात झालीये. एकतर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही. पण कोणी दादागिरी केली तर खपवून घेणार नाही. शिवसेना प्रमुखांनी जे सांगितले तेच पुन्हा सांगतो. मराठा मराठेतर, ब्राह्मण- ब्राह्मणेनंततर 96 -92 कुळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी-कोकणी, हे सर्व मतभेद काढून मराठी बाँधवांची भक्कम एकजूट बांधा. शेवटी एक अवाहन करतो. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पूसू नका, असं ते म्हणाले आहेत.

'माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्याला बैलसुद्धा परवडत नाही.बैल मिळत नाही म्हणून नांगराचं जोखड घेऊन फिरतोय. एकीकडे आमच्या शेतकऱ्याच्या गळ्यात नांगराचं जोखड आहे आणि दुसरीकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाणा, लाज वाटली पाहिजे. आजच पेपरमध्ये बातमी आलीये. लाडक्या बहिणीचे पोर्टल बंद नव्याने नोंदणी होणार नाही. बसा बोंबलत आता. आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात कर्जबाजारी शेतकरी आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही.कर्ज काढतच राहणार. यापुढे उद्धव ठाकरेंनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव घेत म्हणाले, तुम्हाला माहिती असेल आपण चौपाटीला मराठी रंगाभूमीचे दालन उभारण्याचे आदेश दिले होते, आरखडा देखील केला होता. मात्र नंतर बातमी आली त्यांनी हा आराखडा केराच्या टोपलीत टाकला. ती जागा त्यांनी मालकाच्या मित्राच्या घशात घातली. हा मराठीचा तुमचा अभिमान. मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन मी केलं होतं. अजित पवार तेव्हा उपमुख्यमंत्री होते. कुठे गेले मराठी भाषा भवन, मराठी रंगभूमी दालन, का तुम्ही आमची मराठी मारताहेत. का आमच्यावर मराठीची सक्ती करताहेत. अनेकदा सांगितलंय आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाहीयेत. पण आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा अशी दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे आज आपण एकत्र आलो आहेत. तेव्हा पुन्हा काड्या काढण्याचे उद्योग होणार, कारण त्यांचा धंदाच तो आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

'मी नेहमी सांगतो कोणाच्याही लग्नात भाजपला बोलवू नका. येतील श्रीखंड बासूंदी खातील आणि नवरा-बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. पण एवढ केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळवून घेतील जातील. कारण यांचं स्वतःचं असं काही नाहीये. कोणत्याही लढ्यात भाजप कधीच नव्हता. अगदी संयक्त लढ्यातही भाजप शेवटी आला. आणि 57ची निवडणूक झाल्यावर सगळ्यात पहिले बाहेर पडला. यांच्याकडून आम्ही देशाभिमान स्विकारायचा आणि महाराष्ट्राचा अभिमान स्विकारायाचाय़. आम्ही आपापसात भांडून यांना सगळं बहाल करून टाकायचा. अरे आपल्या मुंबईच्या चिंधड्या उडवल्या जातायत. अख्खी मुंबई कोणाचा घशात घालताय. आज मुंबईत अदानींकडे सगळ्यात जास्त जागा आहे. आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही पण मारुती स्त्रोत का विसरायला लावता,' असा सवालदेखील त्यांनी केला आहे.

'हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल. आपला मालक आला म्हणून जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल. डोळे उघडलेत आता जर डोळे उघडले नाही तर कायमचे मिटण्याची वेळ येईल. आत्ताच डोळे  उघडा. आत्ता आलेली जाग जर जाणार असेल मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणून नका. शिवसेनाप्रमुखांनी जे काही शिकवलंय. एक कोणावरही अन्याय करू नका, पण जर कोणी तुमच्यावर हात उचलला तर तो हात जागेवरती ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही, असं म्हणतात. मला एक असा मराठी माणूस दाखवा जो  आपल्या देशात इतर राज्यांत जावून गुंडगिरी करू शकतो. एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेलेचपाटे उठताहेत तमाशे करताय. कोणताही मराठी माणूस, कोणताही परप्रांतिय माणूस इतर राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर चिरून टाकतील तिथली लोकं. बंगालमध्ये जावून बघा. तामिळनाडू मध्ये जावून बघा. हे गुण्यागोविंदाने नांदले आणि एकत्र आले तर आपली पोळी कशी भाजली जाईल. हे सगळे डाव आता उघड झाले आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

Read More