Mohit Kamboj : लोकसभेत महायुतीची जादू चालली नाही, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचा विधानसभेत पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर महायुती समर्थक आणि महाविकास आघाडी समर्थकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालंय. अशातच भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज यांनी गजाभाऊ याला थेट सोशल मीडियावर धमकी दिलीय. एवढंच नाहीतर गजाभाऊनेही या धमकीला प्रतिउत्तर दिलंय.
सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या यशानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होतंय. खास करुन गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले गजाभाऊ या X या सोशल मीडियावरील अकाऊंटमुळे अनेक वादाला तोंड फुटलंय. गजाभाऊ या अकाऊंटवरुन भाजपवर निशाणा साधला जातोय. फक्त भाजप नाही तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात येतं. त्यामुळे अखेर मोहित कंबोज यांनी गजाभाऊला सोशल मीडियावरुन धमकी दिलीय.
मोहित कंबोज यांनी @gajabhauX या आयडीला टॅक करत म्हटलंय की, 'कुठेही असला तरी उचलून आणणार, हर गर महादेव' या शब्दात धमकी दिलीय.
My next target @gajabhauX !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) December 1, 2024
धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !
हर हर महादेव
Save the tweet
या धमकीनंतर गजाभाऊही शांत बसला नाही. त्यानेही मोहित कंबोज यांना उत्तर दिलंय. तो म्हणाला की, 'येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये...मी पण वाट बघतोय...'
येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये ..
— गजाभाऊ (@gajabhauX) December 1, 2024
मी पण वाट बघतोय
गजाभाऊबद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही काळापासून तो सोशल मीडियावरील एक्स हँडल सक्रीय आहे. अनेक विषयांवर भाष्य करुन तो तुफान चर्चेत राहतो. एवढंच नाही तर त्याच्या प्रत्येक विधानानंतर नवीन वादाला तोंड फुटतं. या हँडलवरुन सातत्याने भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांवर टीका करण्यात येते. गजाभाऊ या हँडलवरील बायोमध्ये त्याने सांगितलंय की, तो जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँगचा आहे. खरं हा हँडल व्हेरीफाइड नसून यावरील पोस्टनंतर अनेक वाद उफाळून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता मोहित कंबोज आणि गजाभाऊ यांच्या धमकीचं सत्र सुरु झालंय.