Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'अवकाळी' पावसाने किचन कोलमडलं; भाज्यांच्या दरात मोठी वाढ

गेल्या आठवड्याभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे सामान्यांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. ऐन मे महिन्यात किचन कोलमडल्याच दिसत आहे. 

'अवकाळी' पावसाने किचन कोलमडलं; भाज्यांच्या दरात मोठी वाढ

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. याचा परिणाम थेट सामान्यांच्या किचनवर झाला आहे. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या दरांवर झाला आहे. मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यासारख्या पाले भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. 

मे महिना म्हटला की, कडाक्याचे ऊन असते. या काळात भाज्यांचे दरही कमी झालेले असतात. पण यंदा मात्र अवकाळी पावसामुळे सगळंच चित्र बिघडलं आहे. भाज्यांचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. असं असताना ज्या भाज्या मे महिन्यात थोड्या स्वस्त असतात त्यांच्याच दरात वाढ झाली आहे. दर १० ते २० रुपयांनी किलोमागे वाढण्याची शक्यता आहे. 

भाजी दर 
मेथी :  ४० रुपये जुडी 
टोमॅटो :  ६० रुपये किलो 
शेपू :  ३० रुपये जुडी 
सिमला मिरची :  ६० ते ८० रु. किलो 
कोथिंबीर :  ३० रुपये जुडी 
लिंबू :  १५ ते २० रु. प्रतिनग 
पालक   २० रुपये जुडी 
अद्रक :  ५० रुपये किलो 
कांद्याची पात :  २० रुपये जुडी 
दुधी भोपळा :  ६० रुपये 
वांगे :  ८० रुपये किलो 
कांदे :  ५० रुपये किलो 
फ्लॉवर :  ४० रुपये प्रतिनग 
बटाटे :  ४० रुपये किलो 
कोबी :  ३० रुपये प्रतिनग 
लसूण :  ६० रुपये किलो 
भेंडी  ६० ते ८० रु. किलो 
शेवग्याच्या शेंगा  ४० रुपये जुडी 
कारले :  ४० रुपये किलो 
कैरी :  १०० रुपये किलो 
गवार :  ८० रुपये किलो 
काकडी :  ४० रुपये किलो 

रानभाज्यांवरही परिणाम 

पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या या मे महिन्यात आल्या असून त्यांचेही दर वाढले आहेत. औषधी आणि गुणकारी भाज्या असल्याने ठाणेकर त्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. रानभाजीत शेवळाची एक जुडी ३० ते ५० रुपये तर अळूच्या वड्यांच्या पानाची एक जुडी ३० रुपये अशा दरात विकले जात आहे. 

सामान्यपेक्षा जास्त पाऊस

पुढील एका आठवड्यात देशाच्या दक्षिण आणि ईशान्य राज्यांमध्ये आणि मध्य आणि पूर्व भारतात ४ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल. हवामान खात्याने दावा केला आहे की यावर्षीच्या मान्सूनमध्ये एल निनोची शक्यता नाही. याचा अर्थ असा की यावर्षी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल.

Read More