Monsoon Update : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगले हजेरी लावली आहे. संपूर्ण राज्यात आता मान्सून सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यत आहे. विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. तर मुंबईसह नऊ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनने रविवारी संपूर्ण राज्य व्यापले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर जिल्ह्यात मंगळवारी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मोसमी पावसाने हजेरी लावताच गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. आज मंगळवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देताना हवामान विभागाने ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि सातारा या भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, रायगड ते पालघरदरम्यान मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आजही असाच जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे.
27/6: #नवीमुंबई, #मुंबई & #ठाणे मध्ये आज सकाळपर्यंत गेल्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 27, 2023
संपूर्ण #कोकणसह #मुंबई #ठाणे आणि मध्य #पुणे #नाशिक #सातारा ऑरेंज अलर्टवर 2 दिवस येत आहे, #विदर्भाच्या काही भागांसह. अन्य काही भागातपिवळा अलर्ट.
IMD अपडेट्स पहाpic.twitter.com/O7R3tu2YmN
ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई आणि उपनगरांत सोमवारी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर होता. मुंबईत रविवारी सकाळी 8.30 ते सोमवारी सकाळी 8.30 दरम्यान कुलाबा केंद्रात 63.3 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 24.6 मिमी पावसाची नोंद झाली. तसेच सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाबा येथे शून्य मिमी तर सांताक्रूझ येथे 27 मिमी पावसाची नोंद झाली.