Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Mumbai Rain: मुंबई पोलिसांचा 'हाय अलर्ट'; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना; महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती?

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी हाय अलर्ट जारी केला असून, घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

Mumbai Rain: मुंबई पोलिसांचा 'हाय अलर्ट'; नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना; महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती?

मुंबईत शुक्रवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. पावसाचा परिणाम वाहतुकीवरही झाला असून, लोकलसह रस्ते वाहतूक मंदावली आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी शहरातील आणि आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसंच मुसळधार पावसामुळे सागरी किनारी भागात जाण्याचं टाळण्याचेही निर्देश दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, "मुंबई आणि जवळच्या जिल्ह्यांमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर न पडता घरातच थांबण्याचे, सागरी किनाऱ्यांवर जाणं टाळण्याचे आणि लक्षपूर्वक ड्रायव्हिंग करण्याच्या सल्ला दिला जात आहे".

"आमचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या हाय अलर्टवर असून मुंबईकरांना मदतीसाठी तयार आहोत. कोणतीही इमर्जन्सी असल्यास 100 क्रमांकावर संपर्क साधा," असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई सकाळपासूनच पाऊस  पडत असून, अनेक ठिकाणी नागरिकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. 

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पुढे आणखी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे, जो मध्यम हवामान गतिविधी दर्शवितो, तरीही काळजी घ्यावी लागणार आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी येथेही रेड अलर्ट जारी केला आहे, शुक्रवारी काही ठिकाणी "मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस" आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

सातारा आणि पुण्याच्या घाट भागातही रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. रेड अलर्टचा अर्थ कारवाई करा असा होतो तर ऑरेंज आणि यलो अलर्टचा अर्थ "कारवाई करण्यास तयार रहा" आणि "सावध रहा" असा आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे "तयार रहा", तर पिवळा अलर्ट म्हणजे "सावध रहा" असा इशारा आहे. 

Read More