Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Monsoon Update : राज्यात पुढील 4-5 दिवसांत पावसाचं कमबॅक

हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज

Monsoon Update : राज्यात पुढील 4-5 दिवसांत पावसाचं कमबॅक

मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या उकाडा वाढलाय, नागरिक त्रस्त आहेत. (Monsoon Update :  rainfall activity expected over the region during next 4-5 days with possibitlity of light to moderate rain)  तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात शेतकऱ्यांसमोर पीक जगवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. 

राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं. पण आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवसांनी मध्ये राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

ज्येष्ठ हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी यासंबंधित ट्वीटदेखील केलं आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यातही जर मुसळधार पाऊस झाला तर शेतकऱ्यांना पिक टिकवण्याचं संकट असणार आहे. आज नागपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला अशा एकूण 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. कालही  याच भागात हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता.  

Read More