Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली 150 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक? लातुरमध्ये खळबळ

बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लातूर शहरात अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. 

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली 150 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक? लातुरमध्ये खळबळ

Latur Crime News : बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार लातुरमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात  घेतले आहे. शासकीया योजनेच्या नावाखाली झालेल्या या फसवणुकीमुळे लातुरमध्ये खळबळ उडाली आहे. 

लातुरातील म्हाडा कॉलनी परिसरात काही महिला नागरिकांना भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ.बेटी पढाओ’ या अभियानात पे-टू-पे सोशल फौंउडेशनमध्ये मुलीच्या नावाने 550 रुपये भरुन सभासद करण्यात येत होते. यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी एक लाख रुपये मिळतील असे आमिष दाखविले. शिवाय याबाबत खोटे सांगून महिलांची फसवणूक केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. ही घटना उघडकीस आल्याने पैसे भरलेल्या महिला, नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत जवळपास 150 पेक्षा जास्त जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे ते नागरिक आता समोर येत आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

महिलेला बोलण्यात गुंतवुन दागिने लुटले

महिलेला बोलण्यात गुंतवुन तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा चोरट्याने लंपास केल्याची घटना उल्हासनगर घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.  लता पायगुडे अस महिलेच  नाव आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास लता पायगुडे या कॅम्प 4 येथील मोरिया नगरी रस्त्यावरील कृष्णा मॅरेज हॉल समोरून जात होत्या . त्या वेळेस दोन अज्ञात चोरट्यांनी प्रथम पायगुडे यांना बोलण्यात गुंतवल त्यानंतर तुमच्या कडील सोन्याच्या कानातले मी  रुमालात बांधून ठेवतो असे सांगितले पायगुडे यांनी विश्वासाने ते कानातले त्या इसमास दिले आणि त्या व्यक्तींनी रुमाल पायगुडे यांना देऊन तिथून निघून गेले. मात्र  पायगुडे यांनी रुमाल उघडला तेव्हा त्यांना धक्का बसला कारण त्यांच्या सोन्याच्या कानातल्या जागी तिथे माती निघाली. मात्र सदर महिलेशी बोलताना ते दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणी महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

Read More